टेट्रा पाकचा चाकणमध्ये ७०० कोटीचा प्रकल्प

पुणे दि २ ८ : वेष्टन उद्योगातील जागतिक दर्जाच्या टेट्रा पाक कंपनीने चाकणमध्ये ७ ० ० कोटी रुपये खर्चून न अत्याधुनिक प्रकल्प उभारला असून देशातील ग्राहकांसह दक्षिण आशिया आणि पश्चिम आशियाच्या बाजारपेठेत येथून निर्यात केली जाणार आहे अशी घोषणा कंपनीचे अध्यक्ष डेनिस योन्सन यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली

स्वीडनचे राजदूत हाराल्ड सांडबर्ग , दक्षिण आशियाचे व्यवस्थापकीय संचालक कंदर्प सिंग यांनी येथील प्रकल्पाचे उद्घाटन केले. योन्सन पुढे म्हणाले की टाकवे येथील याआधीचा प्रकल्प बंद केला जाणार आहे. जगातील सर्वात वेगाने वाढणारी भारत ही बाजारपेठ असून या भागातील वाढती मागणी पूर्ण करण्यास नव्या प्रकल्पाचा मोठा फायदा होणार आहे. ४ ५ एकर जागेत हा प्रकल्प असून त्यात स्ट्रा उत्पादन, प्रक्रिया यंत्रणा, कार्यशाळा पदार्थ भरणा केंद्र आणि कर्मचारी प्रशिक्षण केंद्रही असणार आहे .

सध्या आम्ही ६ ० टक्के कच्चा माल भारतातून घेत आहोत आणि हळू हळू हे प्रमाण वाढत जाणार आहे ग्राहकांच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन चाकणच्या जागेत प्रयोगशाळा , चाचणी केंद्र तसेच संशिधान आणि विकास विभागही स्थापन केला आहे अशी माहिती देऊन ते म्हणाले की भारतच्या प्रकल्पाची उलाढाल सध्या १ ० ० ० कोटी रुपये इतकी असून जागतिक पातळीवर पहिल्या दहामध्ये त्याचा क्रमांक येतो. येथील प्रकल्पाची क्षमता ८ . ५ अब्ज वेष्टने प्रतिवर्ष इतकी असून ती १ ६ अब्ज इतकी वाढविता येणार आहे गेल्या वर्षी आम्ही भारतात चार अब्ज वेष्टने इतका व्यवसाय केला आहे. जागतिक पातळीवर हे प्रमाण १ अब्ज वेष्टने इतके आहे.

भारतात दुध आणि दुग्धजन्य उत्पादने आणि त्याचा वापर वाढत असल्याने आम्हाला त्याचा चांगला उपयोग व्यवसाय वाढीस होणार आहे. देशात आमचे ८ ३ हून अधिक उद्योग ग्राहक आहेत चाकणच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये सांगताना पर्यावरण विभागाचे संचालक जयदीप म्हणाले की जगातील हा एकमेव पर्यवरण पूरक
प्रकल्प आहे. येथे ५ ० लाख लिटर पावसाचे पाणी साठविता येणार आहे तसेच विजेची गरज भागविण्यासाठी सौर उर्जेचा वापर केला गेला आहे . तसेच वातानुकूलन यंत्रणेसाठी उष्णतेचा आणि एल एन जी चा वापर केला जातो आहे
फोटो ओ ळी
टेट्रापाक अध्यक्ष डेनिस योन्सन आणि दक्षिण आशियाचे व्यवस्थापकीय संचालक कंदर्प सिंग

Leave a Comment