तीन मिनिटांत सोनाक्षी नेसली नऊ साड्या

दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा चित्रपट असो वा एखादा कार्यक्रम अनेक वेळा अंगभर साडी परिधान करून दिसलेली आहे. साडीमध्ये ती सुंदरसुद्धा दिसते. साडीतील आपल्या या देशी रूपाला सोनाक्षीने आता आणखी नव्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. ‘लुटेरा’ या आपल्या आगामी चित्रपटामध्ये तिने साडी परिधान करण्याचा नवा विक्रम नोंदविला आहे. त्यातील एका गाण्यात सोनाक्षीने अवघ्या तीन मिनिटांत एक-दोन नव्हे तर तब्बल नऊ साड्या नेसल्या आहेत. या
चित्रपटात सोनाक्षी आणि रणवीर सिंह यांची जोडी प्रथमच पडद्यावर दिसणार आहे. या चित्रपटाची कहाणी ५0 च्या दशकातील कालखंडावर आधारित आहे. त्यामुळे त्यामध्ये सोनाक्षी विविध प्रकारच्या साड्या नेसून दिसणार आहे.

सवांर लू..असे शब्द असलेल्या या गाण्यामध्ये सोनाक्षीसाठी खास प्रकारच्या साड्यांची निवड करण्यात आली होती. या साड्यांमध्ये तिचे सौंदर्य आणखी उजळून निघाले आहे आणि तिच्या या रूपामध्ये सुमारे ६0-७0 वर्षांपूर्वीची झलक स्पष्ट दिसली आहे. फक्त याच गाण्यासाठी सोनाक्षीने नऊ विविध प्रकारच्या साड्या परिधान केल्या होत्या. त्यांची किंमत जवळपास तीन लाख रुपये असून प्रत्येक साडीसाठी लुटेराचा निर्माता विक्रम भट्टला ३0 ते ३५ हजार रुपये मोजावे लागले आहेत. या सगळ्य़ा साड्या हस्तमागावर विणलेल्या होत्या.

या गाण्यात अनेक दिवसांचा फ्लॅशबॅक दिसणार असल्याने एवढय़ा साड्या बदलणे गरजेचे होते. या चित्रीकरणानंतर जो परिणाम दिसून आला त्यामुळे लुटेराचे सगळे युनिट खासकरून सोनाक्षी अतिशय खुश आहे. ती सांगते की, विक्रम आणि सगळ्या युनिटने लुटेरामध्ये मला सुंदर दाखविण्यासाठी अतिशय मेहनत घेऊन काम केले आहे. साडी नेसण्यात तरबेज झालेली सोनाक्षी या
चित्रपटात फक्त साडीमध्ये दिसणार आहे.