पुणे दि २ ८ : सोन्याची नाणी विकण्यास सार्वजनिक क्षेत्रातील बँकांवर कोणत्याही प्रकारचे निर्बंध घातले जाणार नाहीत असे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डी सुब्बराव यांनी आज येथे पत्रकारांना सांगितले .
सोन्याची नाणी विकण्यास बँकांवर निर्बंध नाहीत -रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर
सोन्याच्या वाढत्या आयातीमुळे चालू खात्यावरील तुट साडेसहा टक्क्यांच्या घरात गेली आहे ही केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँके ्च्या दृष्टीने चिंतेची बाब आहे यामुळे ही आयात कमी व्हावी यासाठी गोल्ड म्युच्युअल फंड , बॅंकेतर वित्त कंपन्या यांच्यावर दोन दिवसापूर्वी निर्बंध घालण्यात आले. त्या पार्श्वभूमीवर विचारले असता सुब्बराव म्हणाले की सोन्यात सट्टा रूपी गुंतवणूक होऊ नये यासाठी आमचे प्रयत्न चालू राहतील . त्यामुळे गोल्ड इ टी एफ च्या बदल्यात कर्ज देऊ नये अशी सूचना आम्ही बँकांना दिली आहे. मात्र सोन्याची नाणी विकण्यावर बंदी घालण्याचा सध्या तरी विचार नाही
कोणत्याही स्वरुपात सोन्याच्या बदल्यात कर्ज देण्यास बॅंकेतर वित्त कंपन्यांना मनाई करण्यात आली आहे. दागिने , नाणी , इ टी एफ तसेच म्युच्युअल फंडाची युनिट खरेदी करण्यास कोणी सोने तारण ठेवून कर्ज मागितले तर ते देऊ नये असे बँकेने म्हटले आहे