नवी दिल्ली, दि.२८ – पक्षविरोधी भूमिका घेतल्याने भाजपचे ज्येष्ठ नेते राम जेठमलानी यांची पक्षातून हाकलपट्टी करण्यात आली आहे. पुढील सहा वर्षांसाठी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. ते अनेकदा भाजपविरोधी वक्तव्याने पक्षास गोत्यात आणत होते.

जेठमलानी यांनी यापुर्वीही अनेकवेळा आपल्या पक्षाच्या नेतृत्त्वावर चांगलेच तोंडसुख घेतले आहे. तसेच त्यांच्या कार्यपद्धतीबाबतही खुली नाराजी व्यक्त केली आहे. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनाच एनडीएतर्फे पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित करण्याबाबतचे वक्तव्य त्यांनी अनेकदा केले आहे. सीबीआय प्रमुख रणजित सिन्हा यांच्या नियुक्तीविषयी प्रतिक्रिया देऊन जेठमलानी यांनी आपल्या पक्षाला चांगलेच अडचणीत आणले होते.
गेल्या वर्षी २५ नोव्हेंबर रोजीही राम जेठमलानी यांना पक्षातून निलंबीत करण्यात आले होते. निलंबन केल्यानंतर बोलताना त्यांनी सीबीआय प्रमुख पदाची नियुक्ती चुकीची असल्याचे म्हटले होते. त्याचसोबत त्यांनी पक्ष नेतृत्त्वावर कारवाई करण्याचे आव्हानही दिले होते. रणजित सिन्हा यांच्या नियुक्तीवरून त्यांनी पक्षावरही ताशेरे ओढले होते. पूर्ती समुहात झालेल्या आर्थीक गैरव्यवहार समोर आल्यानंतर त्यांनी माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्यावरही आरोप केले होते.