जळगाव घरकुल घोटाळा – देवकर, सुरेश जैन यांच्यावर आरोप निश्चित

जळगाव, दि.२८ – जळगाव घरकुल घोटाळा प्रकरणी राज्याचे परिवहन राज्य मंत्री गुलाबराव देवकर, तसेच माजी मंत्री सुरेश जैन यांच्यावर आरोप निश्चिवत करण्यात आले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी २९ मे रोजी आहे. यामुळे गुलाबराव देवकर यांचा मंत्रिपदाचा राजीनामा पुन्हा चर्चेत येणार आहे.

जळगाव घरकुल घोटाळा प्रकरण १६९ कोटी रूपयांचे असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी आणखी 50 जणांवर आरोप निश्चिचत करण्यात आले आहेत. सुरेश जैन सध्या अटकेत आहेत. प्रकृती बिघडल्याच्या कारणाखाली ते सध्या मुंबईच्या एका दवाखान्यात दाखल आहेत. सुरेश जैन यांचा जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला आहे. यापूर्वी परिवहन राज्यमंत्री गुलाबरावर देवकर यांच्यावर मंत्रिपदाचा राजीनामा देण्यासाठी दबाव वाढला होता. मात्र राष्ट्रवादी त्यांच्या पाठिशी उभा ठाकला होता. या प्रकरणाची पुढील सुनावणी उद्याच होणार असल्याने, गुलाबराव देवकर यांच्यापदावरही टांगती तलवार आहे.

Leave a Comment