“शाळा” हा शब्द उच्चारताच प्रत्येकाला आपल्या शाळेचे ते रम्य दिवस लगेच आठवतात. सुजय डहाके एक असा दिग्दर्शक ज्याने आपल्यला “शाळा” या
त्याच्या पहिल्या सिनेमातून आपल्याला शाळेचे ते दिवस आठवून दिले. सुजय आता त्याचा एक अनोखा विषय असलेला सिनेमा आपल्यासमोर लवकरच घेऊन येत आहे ज्याचे नाव आहे “आजोबा”. येत्या १ जूनला “आजोबा” या सिनेमाचा पहिला टीझर आपल्याला इंटरनेट आणि सोशल मिडियाच्या माध्यमातून भेटीस येणार आहे.
“आजोबा” चा पहिला टीझर १ जूनला
“आजोबा” ही कथा आहे एका बिबट्याच्या अनोख्या प्रवासाची, जी सत्य घटनेवर आधारित आहे. २०१३ सालातील “आजोबा” हा “मोस्ट अवेटेड” सिनेमा आहे. या सिनेमाची आणखीन एक खासबात म्हणजे यामधील स्टारकास्ट ज्यामध्ये उर्मिला मातोंडकर, ऋषिकेश जोशी, यशपाल शर्मा, नेहा महाजन, सुहास शीरसाट, शशांक शेंडे, श्रीकांत यादव, ओम भूतकर, अनिता दाते आणि चिन्मय कुलकर्णी अशी स्टार मंडळी आहेत. सध्या या सिनेमाचे पोस्ट प्रोडक्शन चे काम सुरु असून लवकरच हा सिनेमा आपल्या भेटीस येणार आहे.