सुनिल कुलकर्णींचा ट्रॅफिक जाम

पुणे, दि. 27 (प्रतिनिधी) – टेलिफिल्म ‘गदर’, ‘सगे सोयरे’, ‘ाअनंद महिमा’ ‘कलम 302’, ‘मला एक चानस हवा’ नंतर परत एकदा सुनिल कुलकर्णी हे नाव चर्चेत आले आहे ते ‘ट्रॅफिक जाम’ या आगामी मराठी चित्रपटामुळे. येत्या शुक्रवारी प्रद्रशित होणार्‍या या चित्रपटात सुनिल पोलिस कमिशनरच्या भुमिकेत आहेत. तर खालनायकाच्या भुमीकेत आहे सिंघमफेम अशोक समर्थ.
बॉलिवुडमम्ध्ये पक्क स्थान निर्माण करणार्‍या अशोक बरोबर काम करण्याची संधी मिळाल्याच समधान कुलकर्णी व्यक्त करतात, बांधकाम व्यवसायीक असलेले सुनिल कुलकर्णी खुप वल्ली आणि अवलिया आहेत त्यांनी पुणे ते लंडनासा प्रवास स्कुटरवर केला आहे, व्यवसाय वेगळा असला तरी त्यांच्यातील कलाकार त्यांना स्वस्थ बसु देत नाही त्यांचे वैशिट्ये म्हणजे त्यांना अभिनयापोटी
मिळालेले मानधन ते संस्थांना देणगी स्वरूपात देतात. ट्रॅफिक जामची निर्मिती मयुर मिनियार यांची आहे तर दिग्दर्शन संजय पाटेल यांचे तर छायाचित्रण इम्तियाज बारगीर यांचे आहे.