‘साहित्य परिषदेतील मानापमान नाटक थांबले तरच विश्‍वसंमेलने होतील ’

पुणे, दि. 27 (प्रतिनिधी) – जगात पसरलेली मराठी मंडळी मराठी लेखक, कवी यांना ऐकण्यासाठी उ त्सुक आहेत. मात्र त्यासाठी साहित्य संस्थांवर कार्य करणार्‍या लोकांनी मानापमानाची लढाई बंद करण्याची गरज असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
मराठी साहित्य महामंडळाचे काम म्हणजे साहित्य संंमेलनाला लेबल लावणे, दरम्यान मराठवाडा साहित्य परिषदेकडे महामंडळाचे कार्यालय असताना तत्त्कालीन अध्यक्ष कौतीकराव ठाले पाटील यांनी विश्‍वसंमेलनाचा घाट घातला आणि तशी घटनादुरूस्ती करून घेतली. इथेही नियम तोच आयोजकांनी खर्च करायचा अटी, शर्ती मात्र महामंडळाच्या. चौथ्या विश्‍वसंमेलनासाठी मागीलवर्षी टोरांटो पाठोपाठ आणि यंदा लंडनच्या आयोजकांनी असमर्थता दर्शविली. यामुळे विश्‍वसंमेलनाची आवश्यकता अहे का? असा प्रश्‍न पुन्हा चर्चीला जाऊ लागला आहे

या विषयी बोलताना प्रसिद्ध कवी प्रा.इंद्रजित भालेराव म्हणाले, देशापासून दूर राहणार्‍या व्यक्तींना आपल्या मातृभूमीविषयी कायम ओढ असते, विश्‍व संमेलनाच्या निमिताने ते लोक आपली वैचारीक गरज भागवण्याचा प्रयत्न करतात. संमेलनाच्या निमिताने त्या लोकांना एकाच वेळी अनेक लेखक, कवी यांच्याशी संवाद साधता येतो तसेच महाराष्ट्राबाहेरील लोकांना आपल्या विषयी काय वाटते हे आपल्याला समजते यामुळे अशा संमेलनाची आवश्यकता आहे. कारण मी एखादा कार्यक्रम तिकडे घ्यायचा ठरवले तर किती लोकांचा प्रतिसाद मिळेल हे सांगता येत नाही, संमेलनासाठी ते लोक सुट्या घेऊन कार्यक्रमाना हजेरी लावतात यावरून त्यांना आपल्या साहित्या विषयीची ओढ आहे हे सॅनहौजे येथील संमेलनात दिसले.

साहित्य संस्थावर साहित्यिक नसल्याने संमेलनाचे स्वरूप बदलत आहे असे म्हटले जात आहे मात्र लेखक, कवी या प्रतिभावान माणसांनीच साहित्य संस्था चालवाव्यात असे मला वाटत नाही. आमचे काम साहित्यनिमिर्तीचे आहे. ज्या लोकांना संस्थात्मक कार्यात रस आहे ते लोक संस्था चालवत आहेत त्यात गैर नसल्याचे प्रा. भालेराव यांनी नमुद केले.

ज्येष्ठ कवी प्रविण दवणे म्हणाले, पहिल्या विश्‍व संमेलनाला निमंत्रक कवी म्हणुन गेलो त्यावेळी तीथे नेमकी काय स्थिती असेल याची मनात भिती होती. नंतर असे जाणवले की हा अभिरूची संपन्न वर्ष मातृभुमी – मातृभाषेपासून दुर गेल्याने त्यांना या गोष्टींची किंमत समजली आहे. कारण महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात मिळणार्‍या प्रतिसादा एवढाच किंब्बहुना त्यापेक्षा जस्त प्रतिसाद विश्‍वसंमेलनात मिळाला, हाच अनुभव मला दुबई येथे मी 18 कार्यक्रम केले तेंव्हा मिळाला.
विश्‍व संमेलन रद्द होण्यामागची कारणे राजकीय, आर्थिक असली तरी साहित्य क्षेत्रात, साहित्य संस्थावर जे साहित्यप्रेमी कार्यकर्ते काम करतात त्यांनी आपापले इगो दुर ठेऊन साहित्याला वाहुन घेण्याचे कार्य प्रामाणिकपणे करण्याची आवश्यकता आहे. साहित्यीक मंडळी संस्थात्मक कार्यात गुंतली तर सृजनशिल साहित्य निर्मितीवर त्याचा परिणाम निश्‍चित होईल, साहित्यीकांनी साहित्य संस्थावर कार्य करा हा आग्रह चुकीचा असल्याचे दवणे यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment