पुण्यात साखळी चोऱ्यांची डबल सेंच्युरी

पुणे दि.२७ – शनिवार आणि रविवार या दोन दिवसांत शहराच्या विविध भागात घडलेल्या सहा साखळी चोरीच्या घटनांनी या वर्षात झालेल्या साखळी चोर्यां ची संख्या २०० वर गेली आहे. २०१२ या संपूर्ण वर्षात अशा ४४० घटना घडल्या होत्या. या वर्षात मात्र पहिल्या सहा महिन्यांतच दोनशे घटना घडल्या आहेत.

या प्रकारच्या चोऱ्यामुळे नागरिक हैराण झाले असून पोलिसांच्या अकार्यक्षमतेबद्दल सर्व थरांतून नाराजी व्यक्त केली जात आहे. खुले आम चोरटे साखळ्या खेचत आहेत आणि शहरात पोलिसांचे अस्तित्व कुठेच जाणवत नाही अशी नागरिकांची तक्रार आहे. या प्रकारांमुळे महिलांच्या जीवालाच धोका निर्माण झाल्याची प्रतिक्रीयाही व्यक्त होत आहे. इतक्या सर्रास हे प्रकार घडत आहेत याचाच अर्थ साखळी चोरांना पोलिसांची भीती राहिलेली नाही असाही सूर जनतेतून उमटत आहे.

शनिवारी आणि रविवारी सकाळच्या वेळात चिचवड, आंबेगांव पठार, चिखली, दापोडी, पिपळे गुरव या भागात घडलेल्या साखळी चोऱ्यात साडेतीन लाख रूपयांचा ऐवज लंपास करण्यात आला असल्याचे समजते.

Leave a Comment