छत्तीसगड नक्षली हल्ल्याचा तपास एनआयए कडे

रायपूर दि.२७- काँग्रेसच्या परिवर्तन रॅलीवर बस्तर जिल्ह्यात करण्यात आलेल्या नक्षली हल्ल्याचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच एनआयएकडे सोपविण्यात आल्याचे समजते. एनआयएचे तपास पथक आजच रायपूर येथे दाखल होत आहे असे सांगितले जात आहे.

केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार यांनी न्यूयॉर्क येथून फोनवरून बोलताना असे सांगितले की छत्तीसगढचे मुख्यमंत्री रमणसिह यांनी हा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपविण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार गृहमंत्रालयाचे सचिव आर.के. सिग पुढील कार्यवाही करत आहेत. ही बाब पंतप्रधान मनमोहनसिग यांच्याही कानावर घातली गेली असून स्वतः गृहमंत्रीच त्यांच्याशी बोलले आहेत.

शनिवारी सशस्त्र माओवाद्यांनी काँग्रेस रॅलीवर केलेल्या हल्ल्यात २९ जणांचा मृत्यू झाला असून त्यात काँग्रेसचे कर्मा, नंदकुमार पटेल त्यांचा मुलगा दिनेश, माजी आमदार उदय मुदलियार ठार झाले आहेत तर अन्य ३२ जण जखमी झाले आहेत. त्यात माजी मंत्री विद्याचरण शुक्ल यांचाही समावेश आहे.

Leave a Comment