गाईला वासरू जसे लुचते तसे गाणे दिसले की कवित्व सुचू लागते – पाडगावकर

पुणे, दि. 27 (प्रतिनिधी) – ‘‘ कोणाला गाणे सङ्कजेनासे झाले तरी ङ्काझ्ङ्मा ङ्कनातील कवित्व जागे होते , अशा शब्दात ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकरांनी कविता सादर करत रसिकांची मने जिंकली. निमित्त होते मसाप सन्मानाचे.

महाराष्ट्र साहित्यपरिषदेने वर्धापनदिनानिमित्त ‘मसाप सन्मान’ संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते पाडगवकर यांना आणि भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कार संत नामदेव अध्यसनाचे प्रमुख डॉ. अशोक कामत यांना प्रदान केला ,. यावेळी मसापचे अध्यक्ष डॉ. प्र.चिं. शेजवलकर, कार्याध्यक्षा डॉ. माधवी वैद्य, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनिल महाजन, भारती विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. शिवाजीराव कदम, माजी अमदार उल्हास पवार, चंद्रकांत शेवाळे आदी उपस्थित होते.

गाण म्हणजे काय? ते कधी? कुठे? आणि कस गायल पाहिजे याच वर्षण करणार्‍या गाण या कवितेत पाडगवकर म्हणतात ‘‘ गायजवळ घेते नि वासरू लुचु लागत, आपण गाऊ लागलो की गाण सूचु लागत’’ यानंत त्यांने सादर केलेल्या चिऊ ताई या कवीतेलाही रसिकांनी भरभरून दाद दिली. यावेळी डॉ. सदानंद मोरे, डॉ. अशोक कामत यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. माधवी वैद्य यांनी तर सुत्रसंचालन कल्याणी दिवेकर यांनी केले.
फोटो ओळ – निवारा सभागृह, महाराष्ट्र साहित्यपरिषदेच्यावतीने देण्यात येणारा मसाप सन्मान ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांना डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला यावेळी डॉ. शिवाजीराव कदम, डॉ. प्र.चिं. शेजवळकर.

Leave a Comment