लोकसंख्येत महाराष्ट्र देशात दुसर्‍या क्रमांकावर

मुंबई दि.२५- गत वर्षी म्हणजे २०११ सालात केल्या गेलेल्या जनगणनेचा प्राथमिक अहवाल आता तयार झाला असून त्यानुसार महाराष्ट्र देशातील राज्यात लोकसंख्येच्या बाबत दुसर्‍या क्रमांकाचे राज्य ठरला आहे. राज्याचे मुख्य सचिव जयंत बाठिया यांच्या हस्ते या प्राथमिक अहवालाचे प्रकाशन करण्यात आले.

राज्यातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या जिल्ह्यांमध्ये ठाणे प्रथम असून त्यापाठोपाठ पुणे आणि मुंबई उपनगर यांचा क्रमांक आहे. सिधुदुर्ग जिल्हा सर्वात कमी लोकसंख्येचा ठरला आहे. महाराष्ट्रात शहरी लोकसंख्येत वाढ दिसून आली असून ती दशकाभरात ४२.४ वरून ४५.२ टक्के इतकी झाली आहे. राज्यात ५,८२,४३.०५६ इतके पुरूष आहेत तर महिलांची संख्या आहे ५,४१,३१,२७७.

राज्यात मुलगे आणि मुली यांचे प्रमाण १ हजार मुलांमागे ९२९ मुली असे दिसत असले तरी शून्य ते सहा वयोगटात हेच प्रमाण हजारी ८९४ मुली इतकेच आहे असेही अहवालावरून स्पष्ट झाले आहे.

Leave a Comment