विध्वंस वाड्यात बच्चूताईचा प्रवेश

nirmiti

महाराष्ट्राची प्रथम क्रमांकाची लोकप्रिय जी ई सी वाहिनी स्टार प्रवाह नेहमीच आपल्या प्रेक्षकांना विविध प्रकारचे मनोरंजन सादर करीत आली आहे. आपल्या मालिकांद्वारे अधिकाधिक मनोरंजन करण्याचा प्रयत्न नेहमीच स्टार प्रवाह ने केला आहे. याच वाहिनी वरील लोकप्रिय मलिका आंबटगोड मध्ये लवकरच एक नवीन सदस्य प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. येत्या २३ मे पासून विध्वंस वाड्यामध्ये बच्चूताईचा प्रवेश होत आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री निर्मिती सावंत या भूमिकेत दिसणार आहेत.

बच्चू ताई उर्फ चारुलता पेंडसे हि दामिनीची मोठी बहिण. आपल्या आई-वडिलांच्या मागे बच्चूताईनेच दामिनी आणि भाऊ सुधाकरचा सांभाळ केला. स्वतःचे शिक्षण, लग्न, मौजमजा या सगळ्यांची आहुती देवून आपल्या भावंडांचे संसार उभे केले. या सगळ्या मध्ये तिचा स्वतःचा संसार उभा करायचा राहूनच गेला. परंतु आपल्या भावाबहिणीच्या कुटुंबालाच तिने आपले कुटुंब मानले. प्रथमदर्शनी बडबडी, फटकळ वाटणारी बच्चू ताई मनातून संवेदनशील ,मायाळू आणि निरागस आहे..

या वाड्याशी बच्चूताईचे जवळचं नाते आहे. दामिनीची आणि तिच्या सुनांची बाळंतपणे बच्चूताईनेच केली आहेत. त्यामुळे तिला या वाड्यात विशेष मान आहे. रत्नागिरीतील गुहागर तालुक्यातील मधल्या आळीत राहणारी बच्चूताई पुन्हा एकदा विध्वंस वाड्यात डेरेदाखल झालीय. वाड्याची घडी विस्कटली असताना , बच्चू ताई विध्वंस वाड्यावरील वादळाला थोपवू शकतील का? पहा सोमवार ते शनिवार रोज रात्री ९ वाजता , आपल्या स्टार प्रवाहावर…

Leave a Comment