भारतीय बाजारात ब्रँडेड गॉगल्स व चष्म्यांची चलती

पुणे दि. २५- आजकाल भारतीय बाजारात विविध र्ब्रंडेड कंपन्यांचे चष्मे आणि गॉगल्सची मागणी लक्षणीयरित्या वाढल्याचे निदर्शनास येत असून या बदलाची नोंद घेत या क्षेत्रातील अनेक नामवंत कंपन्यांनी आपापली उत्पादने अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचावीत यासाठी देशभरात विक्रीचे जाळे अधिक मजबूत करण्यावर भर दिला असल्याचे दिसून येत आहे.

ग्राहकांची वाढलेली क्रयशक्ती, युवा वर्गात गॉगल्स आणि चष्म्यांना फॅशन व स्टाईल चा मिळालेला दर्जा आणि ऑनलाईन शॉपिग ट्रेंड ही या मागणी वाढण्यामागची कही कारणे असल्याचे जाणकार सांगतात. भारतातील नंबर वन समजले जाणारे टायटनच्या आयवेअर ने देशातील २२० शहरात आपली स्टोअर्स नव्याने सुरू केली आहेत. कंपनीचे अध्यक्ष रवी कांत यांच्या म्हणण्याप्रमाणे सध्या उन्हाळा असल्याने गॉगल्सना चांगली मागणी आहे आणि स्टाईल म्हणूनही विविध प्रकारचे चष्मे आणि गॉगल्स खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढला आहे.

ईबे इंडियाच्या प्रमुखांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या स्टोअरमधून दररोज किमान दोन हजार चष्मे गॉगल्स खरेदी केली जात असून त्यात पुरूषांच्या बरोबरीने तरूण महिला वर्गाचाही समावेश आहे. रे बॅन या प्रसिद्ध गॉगल्स उत्पादक कंपनीनेही त्यांची विक्री गेल्या चार वर्षात दुपटीने वाढली असल्याचे सांगितले आहे. या व्यवसायात सध्या २२०० कोटी रूपयांची उलाढाल होत असल्याचेही समजते.

Leave a Comment