ऑस्टेलियातील फिरते घर विक्रीला

कॅनबेरा दि.२५ – बटण दाबताच ३६० अंशात फिरणारे कॅनबेरा या भागात बांधले गेलेले अद्भूत घर लिलावात काढण्यात आले असून त्याला किमान १० लाख डॉलर्स किमत मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

एमएजी बांधकाम कंपनीतील जॉन अँड्रीओलो याच्या कल्पनेतून हे घर साकार केले गेले आहे. चार बेडरूम्स असणार्‍या या घराला २८ चाके आणि दोन इलेक्ट्रीक मोटर्स आहेत. घराला चार कार गॅरेज आहेत आणि त्यावर बसविलेल्या फोटो व्होल्कॅनिक पॅनलमधून १०५०० किलोवॅट वीज मिर्मिती केली जाते. सूर्य जसा कलेल तसे हे घर फिरविता येते. म्हणजे उन्हाळ्यात सूर्याच्या विरूद्ध बाजूने फिरवून सावली मिळते तर हिवाळ्यात सूर्याच्या दिशेने फिरवून उबदार सूर्यप्रकाश घरात घेता येतो.

टच स्क्रीनच्या सहाय्याने घर फिरविण्यासाठी असलेल्या बटणाचे नियंत्रण करता येते. तीन स्पीडमध्ये घर फिरू शकते. सर्वात जलद म्हणजे १३ मिनिटात घर ३६० अंश फिरू शकते. या घराचे प्लंबिग व वायरिंग घराच्या मधोमध केले गेले आहे आणि लवचिक पाईप वापरल्याने हे पाईपही घराच्या दिशेने फिरविता येतात असे समजते.