रामायणावरील नव्या हिंदी सीडीचे प्रकाशन सोमवारी

पुणे, दि. 24 (प्रतिनिधी) – आपल्या विविध उपक्रमांद्वारे तरुण पिढीत अध्यात्माविषयी जागृती वाढविण्यासाठी कार्यरत असलेल्या पुण्यातील श्री संत सेवा संघातर्फे रामायणावर आधारित ‘रामायण – आदर्श समाज का स्वर्णचित्र’ ही म्युझिक सीडी (हिंदी) तयार करण्यात आली आहे. संघाच्या अनाहत स्टुडिओच्या निर्मितीचे प्रकाशन येत्या सोमवारी बालगंधर्व रंगमंदिरात होणार आहे.

एकूण 18 रचनांचा समावेश असलेल्या सीडीचे प्रकाशन ज्येष्ठ प्रवचनकार समर्थव्रती सुनील चिंचोळकर यांच्या हस्ते केले जाणार आहे. गदिमा प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्‍वस्त आणि ज्येष्ठ संगीत दिग्दर्शक आनंद माडगूळकर हे याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत. सीडीच्या प्रकाशनप्रसंगी स्थानिक कलाकार नेहा भाटे आणि चमूतर्फे फ्युजन नृत्याविष्कार सादर केला जाणार आहे.

रामायणातील मूल्यांचे आणि विचारांचे महत्त्व आधुनिक युगात सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी संत सेवा संघाचे जीवन धर्माधिकारी यांनी रामायणातील अनेक व्यक्तिरेखांभोवती हिंदीमध्ये काही रचना शब्दबद्ध व संगीतबद्ध केल्या आहेत. या सीडीतील रचना पं. रघुनंदन पणशीकर, पं. विजय कोपरकर, पं. शौनक अभिषेकी, पं. संजीव अभ्यंकर, महेश काळे, चैतन्य कुलकर्णी, पार्थ उमराणी, विभावरी आपटे-जोशी, मृदुला तांबे आणि स्वतः जीवन धर्माधिकारी यांनी गायल्या आहेत.

Leave a Comment