मराठी साहित्य संमेलनाला लंडनचे आमंत्रण

पुणे, दि. 24 (प्रतिनिधी) – अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कार्यालयमहाराष्ट्र साहित्यपरिषदेकडे आल्यानंतर नवीन कार्यकारिणीची पहिले बैठक उद्या (शनिवर) बैठक होणार आहे. या पहिल्या बैठकीत विश्‍व मराठी साहित्य संमेलना बरोबरच अखिल भारतीयसाहित्यसंमेलनाच्या स्थळा विषयी चर्चा होणार आहे.
विश्‍व साहित्य संमेलनासाठी महामंडळाला लंडन येथील निमंत्रण प्राप्त झाले आहे. गेल्या वर्षी टोरोंटो येथील नियोजित विश्‍व साहित्य संमेलन रद्द करण्याची नामुष्की महामंडळावर ओढवली होती. त्या वेळी ’दुधाने तोंड पोळल्याने आता महामंडळाला ताकही ’फुंकून प्यावे लागणार आहे. दरम्यान राज्यात असलेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे विश्‍व साहित्यसंमेलनाला राज्यशासनाकडुन मिळणार्‍या 25 लाख रूपयांच्या निधी निषयी साशंकता निर्माण झाल्याने लंडन येथील आयोजक पूर्ण खर्च करण्यास तयार असेल तरच हे संमेलन होईल असे समजते.

महामंडळाच्या उद्याच्या बैठकीत विश्‍व साहित्यसंमेलनाबरोबर 87 व्या अखिल भारतीयसाहित्यसंंमेलनाच्या स्थळाबाबत चर्चा होणार असल्याची माहिती महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांनी दिली. अ. भा. मराठी साहित्य संमेलनांसाठी पिंपरी-चिंचवड व अचार्य अत्रे प्रतिष्ठाण, सासवड यांच्या कडुन निमंत्रण आले आहे. महामंडळाची ही पहिलीच बैठक असल्याने संमेलन घेण्याविषयी ’क्त प्राथमिक चर्चा होणार असून त्याना नंतर संमेलनाचे स्थळ निवडण्यात येणार असल्याचे डॉ. वैद्य यांनी सांगीतले.

Leave a Comment