पुणे, दि. 24 (प्रतिनिधी) – निर्माता-दिग्दर्शक महेश टिळेकर यंाच्या ‘वरदलक्ष्मी चित्र’ या निर्मिती संस्थेतर्फे दरवर्षी दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘उमेद’ पुरस्कार प्रसिध्द गायिका उषा उत्थुप, अभिनेत्री नृत्यंागना सुधा चंद्रन यांना जाहिर झाला आहे, तर ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान यंाचा विशेष सन्मान केला जाणार आहे.
सुधा चंद्रन, उषा उत्थुप यांना उमेद पुरस्कार
या शिवाय अभिनेत्री भार्गवी चिरमुले, ज्येष्ठ अभिनेते दिलिप प्रभावळकर, अभिनेता अशोक समर्थ आणि नवोदित अभिनेता अभिजित खांडकेकर यंाना ‘उमेद’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. या पुरस्काराचे वितरण जलसंपदा मंत्री सुनिल तटकरे यंाच्या हस्ते निर्माते अनिरुध्द देशपंाडे यंाच्या उपस्थितीत 27 मे रोजी सकाळी 11.30 वाजता यशवंतरावर चव्हाण नाटयगृह येथे होणार आहे.