
नवी दिल्ली- हैदराबाद सनरायझर्सविरुद्धच्या प्लेऑफ सामन्यात राजस्थान रॉयल्सने चार गडी आणि चार चेंडू राखून दणदणीत विजय मिळवला. हैदराबादच्या गोलंदाजांनी राजस्थानच्या फलंदाजांना झटपट बाद केल्याने राजस्थानचा डाव गडगडला असतानाही होडगेने २९ चेंडूत ५४ धावा करुन संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. सहा चेंडूत विजयासाठी १० धावा हव्या असताना होडगेने लागोपाठ दोन सिक्स मारुन विजयावर शिक्कामोर्तब केले. हैदराबाद सनरायझर्सने सात गड्यांच्या बदल्यात १३२ धावा केल्या. तर राजस्थान रॉयल्स संघाने १९.२ षटकात सहा बाद १३५ धावा केल्या.