भाजपवर पंतप्रधान, सोनियांचे टीकास्त्र

नवी दिल्ली, दि.२३ -. काही दिवसांपूर्वी समाप्त झालेल्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांनी आणि विशेषत: भाजपने विविध मुद्द्यांवरून आक्रमक भूमिका घेतली. त्यातून प्रचंड गदारोळ झाल्यामुळे संसदेचे कामकाज ठप्प झाले. या पार्श्वाभूमीवर, सिंग आणि सोनियांनी यूपीए-2 सरकारला चार वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात भाजपला लक्ष्य केले. यावेळी सोनियांनी अन्न सुरक्षा आणि भूसंपादनाशी संबंधित विधेयके मंजूर करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन भाजप आणि इतर विरोधी पक्षांना केले. ही विधेयके लाखों लोकांच्या जीवनाशी निगडीत आहेत. सरकार विरुद्ध विरोधक असा तो प्रश्नर नाही, असे त्या म्हणाल्या.

दरम्यान, भारतीय अर्थव्यवस्थेचे वाईट दिवस संपत चालल्याचा आशावाद यावेळी पंतप्रधान सिंग यांनी व्यक्त केला. चालू आर्थिक वर्षात देशाचा विकास दर ६ टक्क्यांपर्यंत पोहोचेल. पुढील वर्षी होणार्या लोकसभा निवडणुकांनंतर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए केंद्रात पुन्हा सत्तेत आल्यास ८ टक्के विकासदराचे उद्दिष्ट गाठणे शक्य होईल, असा विश्वाासही त्यांनी व्यक्त केला.

पवनकुमार बन्सल आणि अश्व नीकुमार यांच्या राजीनाम्यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, आपल्या टीमच्या विस्ताराबाबत थेट काही बोलण्याचे सिंग यांनी टाळले. दूरसंचार स्पेक्ट्रम आणि कोळसा खाण वाटपाच्या प्रक्रियांमध्ये गैरप्रकार करणार्‍यांवर कारवाई करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. तसेच, भविष्यात नैसर्गिक स्रोतांचे वाटप लिलावाद्वारेच करण्याचे सूतोवाचही त्यांनी केले.

Leave a Comment