अमेरिकन टिन्स ट्वीटरच्या प्रेमात

वॉशिग्टन दि.२३ – सोशल मिडीया साईटमध्ये फेसबुकची ग्राहक संख्या सर्वाधिक असली तरी अमेरिकन टीन्स म्हणजे अमेरिकेची युवा पिढी मात्र फेसबुकऐवजी ट्वीटर या सोशल मिडीया साईटला अधिक पसंती देत असल्याचे पाऊ रिसर्च सेंटरने केलेल्या ऑनलाईन बिहेविअर विषयावरील सर्वेक्षणात दिसून आले आहे.

या सर्वेक्षणासाठी ८०२ पालक आणि ८०२ पाल्य यांची मते नोंदविली गेली तेव्हा असे दिसले की टीन्सच्या मते फेसबुकवर प्रौढांची संख्या फारच जादा आहे आणि फारच नाटकीपणाने लोक ट्वीट करत असतात. त्या तुलनेने ट्विटरवर प्रौढांची संख्या कमी आहे आणि त्यामुळे तेथे ट्वीट करताना होणारी गुंतागुंतही कमी आहे. सर्वेक्षणात असेही दिसले की अनेक टीन्सची आजही फेसबुक अकौंट आहेत मात्र त्याचा वापर केवळ अकौंट चेक करण्यापुरताच केला जातो. ९४ टक्के युजर रोज अकौंट चेक करतात पण त्याचा वापर करत नाहीत. फोटो शेअरिंग सेवेसाठी इस्टाग्रामला ते अधिक पसंती देतात. विशेष म्हणजे इन्स्टाग्राम गेल्याच वर्षी फेसबुकने विकत घेतली आहे.

ट्वीटर युजरमधील ६० टक्के युजर सार्वजनिक रित्या ट्वीट करतात त्यात मित्र, शत्रू, अनोळखी सर्व जण हे ट्वीट पाहू शकतात. मात्र ही युवा पिढी सावधानतेच्या बाबतीतही चांगलीच दक्ष आहे असेही दिसून आले आहे. आजकाल आपली ओळख देणार्‍यांचे प्रमाण वाढत चालले असून १० पैकी सात जण गावाचे किवा शहराचे नांव देतात. तर २० टक्के युजर सेल नंबरही देतात असेही दिसून आले आहे.