रोमानियन टीव्ही अँकरशी सलमान होणार चतुर्भूज?

आजवरची सगळी प्रेम प्रकरणे लग्नाच्या मांडवात पोहोचण्याआधीच तुटल्यामुळे बॉलीवूडचा सर्वात आवडता आणि सुयोग्य वर समजल्या जाणार्‍या अभिनेता सलमान खानने आता बहुधा डोक्याला मुंडावळय़ा बांधण्याचा निर्णय पक्का केला आहे, असे वाटू लागले आहे. सलमानचे लग्न जणू राष्ट्रीय मुद्दा बनला आहे.

पत्रकार वा चाहते जेव्हा जेव्हा त्याच्याबाबत बोलतात तेव्हा लग्नाची चर्चा हमखास होते. मात्र यापुढे ही चर्चा थांबण्याची चिन्हे दिसत आहेत. कारण ४७ वर्षांचे वय झालेला सलमान लग्नाबाबत गंभीर झाला आहे. आता सलमानला लग्न करावेसे वाटले ती तरुणी आहे तरी कोण याची उत्सुकता सगळय़ांना लागली असेल. पण कॅटरिना वा अन्य कुणी नाही तर लुलिया वंटूर आहे. रोमानियन
टीव्हीची अँँकर असलेल्या लुलियासोबत सल्लूचे प्रेम प्रकरण सध्या जोरात असून गोव्यात आपल्या आगामी चित्रपटाचे चित्रीकण करत असलेला सलमान फुरसतीच्या वेळी तिच्यासोबतच फिरताना दिसतो. बर्‍याच दिवसांपासून त्यांच्या जवळीकीची चर्चा होत आहे. मागील दोन वर्षांपासून ते एकमेकांसोबत
आहे, पण लुलियासाठी आपले हृदय धडधडते याची सलमानने कुणालाच खबर लागू दिली नाही. सलमानच्या निकटवर्तीयांनीही लुलियाशी लग्न करण्याच्या मुद्यावर सलमान गंभीर दिसत आहे, यास दुजोरा दिला आहे. बॉलीवूडमध्येही त्यांच्या संबंधांची चर्चा आहे. ही दोघेही एकमेकांना अतिशय महत्त्व देत आहेत.सलमानच्या आयुष्यात लुलियाची झलक स्पष्टपणे जाणवते. आता त्याचे सगळेच हितचिंतक तिच्यासोबत बोहल्यावर चढण्याचा सल्ला त्याला देत आहेत. या
विषयावर सलमान काही बोलत नसला तरी त्याचे हे गप्प राहणेच लुलियासोबतच्या नात्याबाबत तो किती गंभीर आहे, हे सांगते. या दोघांची विदेशात भेट झाली होती. लगेचच त्यांची मैत्री जुळली व त्यानंतर ते सतत सोबतच दिसतात.

त्यामुळे सलमानने आपल्या लग्नाची घोषणा केली तर आश्‍चर्य वाटायला नको. लुलियाआधी रूपेरी पडद्यावरील अनेक नट्या सलमानच्या आयुष्यात आल्या. संगीता बिजलानी, सोमी अली, ऐश्‍वर्या रॉय व कॅटरिना कैफ यांच्यासोबतचे त्याचे संबंध काहीतरी कारणांमुळे संपुष्टात आले.

Leave a Comment