याहूने केली टंबलरची खरेदी

न्यूयॉर्क दि.२२- इंटरनेट कंपनी याहूने ब्लॉगिंग साईट टंबलर १.१ अब्ज डॉलर्सला विकत घेतली असल्याचे वृत्त आहे. टंबलरची मालकी घेतल्यामुळे याहूला त्यांचे जुने वैभवाचे दिवस परत मिळण्याची आशा वाटते आहे. याचे कारण म्हणजे टंबलर घेतल्यामुळे याहूच्या युजरची संख्या महिन्याला १ अब्जापेक्षा अधिक होणार आहे.

याहूकडून मिळालेल्या माहितीनुसार टंबलर कंपनी घेण्याची प्रक्रिया २०१३ सालातच पूर्ण केली जाणार आहे. टंबलरचे युजर याहूशी त्यामुळे संलग्न होणार असल्याने त्यांच्या संख्येत ५० टक्के वाढ होण्याची तसेच ट्रॅफिकमध्येही २० टक्के वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. टंबलरने त्यांची साईट दरमहिना ३० कोटी युजर पाहतात आणि दररोज सुमारे १ लाख २० हजार नवीन युजर साईन अप करतात असा दावा केला आहे.

टंबलर बरोबरचा खरेदी सौदा मोठ्या प्रमाणात रोखीनेच केला जाणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

Leave a Comment