अमेरिकेच्या दहशतवादविरोधी केंद्राला सुशीलकुमारांची भेट

वॉशिंग्टन, दि.२२ – केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे सध्या अमेरिकेच्या दौरयावर आहेत. या दौर्‍यावेळी काल त्यांनी अमेरिकेच्या राष्ट्रीय दहशतवादविरोधी केंद्राला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी केंद्राच्या कामकाजाची माहिती जाणून घेतली. भारत आणि अमेरिका यांच्यातील दुसर्याा सुरक्षाविषयक चर्चेसाठी शिंदे येथे आले आहेत. त्यांच्यासमवेत भारतातील एक उच्चस्तरीय शिष्टमंडळही आहे. या दौर्‍यात शिंदे अमेरिकेतील उच्चपदस्थांशी सुरक्षेच्या मुद्द्यावर चर्चा करणार आहेत. दोन्ही देशांच्या दृष्टीने या सुरक्षाविषयक चर्चेला अत्यंत महत्व आहे.