तिहार तुरूंग व्यवसायात ३२ कोटींची उलाढाल

नवी दिल्ली दि.२१ – देशातील सर्वात मोठे कारागृह असलेल्या तिहार तुरूंगात गेल्या वर्षात कारागृह उद्योगातून तब्बल ३२ कोटी रूपयांची उलाढाल झाली असून आत्तापर्यंतचा हा विक्रम असल्याचे तुरूंग प्रवक्त्यांचे म्हणणे आहे. या तुरूंगात बेकरी, कपडे आणि गृहोपयोगी वस्तूंची निर्मिती केली जाते.

या तुरूंगातील उद्योगात २०११-१२ सालात झालेली उलाढाल २० कोटी रूपये होती असे सांगून हे प्रवक्ते म्हणाले की यंदा कच्च्या मालावरील निर्बध उठविले गेले आहेत तसेच कारागृह उद्योगांसाठी अर्थसंकल्पातील तरतूद वाढविली गेली आहे. त्यामुळे उलाढाल वाढली आहे. पुढील वर्षात हाच आकडा ४० कोटी रूपयांचा टप्पा ओलांडेल असा अंदाज आहे. या कारागृह उद्योगात १२ हजार कैदी काम करतात.

Leave a Comment