इराकमध्ये दहशतवादी हल्ल्यात ९५ नागरिकांचे बळी

बगदाद दि.२१ -इराकची राजधानी बगदाद आणि अन्य कांही शहरात सातत्याने चाललेल्या कार स्फोट आणि गोळीबाराच्या घटनेत ९५ नागरिकांना प्राण गमवावा लागला आहे. यात शिया आणि सुन्नी या दोन्ही पथांच्या नागरिकांचा समावेश आहे. गेल्या कांही दिवसांत इराकमधील हिंसाचारांच्या घटनेत लक्षणीय वाढ झाली आहे आणि त्यात शिया सुन्नी दोघांनाही टार्गेट केले जात आहे.

या महिन्यात अशा प्रकारे घडलेल्या घटनांत ३६६ हून अधिक नागरिक बळी गेले आहेत. त्यामुळे देशात पुन्हा एकदा जातीय दंगली भडकण्याची तसेच देश पुन्हा एकदा युद्धाच्या दिशेने जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. इराकी पंतप्रधान नूर अली यांनी सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी मध्यम व उच्च पदांवरील सुरक्षा अधिकारयांना बदलण्याचे संकेत दिले आहेत.

पोलिसांकडून सांगण्यात आले की काबूल शहरात गर्दीची ठिकाणे हेरून १० ठिकाणी कार स्फोट करण्यात आले आहेत व त्यात ४६ ठार व १५० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. बसरा शहरातही कारस्फोटात १३ ठार तर ५० लोक जखमी झाले आहेत.

Leave a Comment