अध्यक्षपद सोडून निवडणुकीत उतरायला हवे होते – झरदारी

इस्लामाबाद, दि. २१ – पाकिस्तानच्या निवडणूक प्रक्रियेत आपण अध्यक्षपद सोडून रिंगणात उतरलो असतो तर चित्र वेगळे दिसले असते, असे पाकिस्तानचे अध्यक्ष असिफ अली झरदारी यांनी म्हटले आहे. साऊथ एशियन फ्री मीडिया असोसिएशनच्या पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे मनोगत व्यक्त केले.

ते म्हणाले की, या निवडणूक काळात आपण राष्ट्राध्यक्षपदावर होतो व सर्वोच्च न्यायालयाने या पदावरील व्यक्तीने राजकारण करू नये, निष्पक्ष भूमिका बजावावी, असे निर्देश दिल्यामुळे आपल्याला निवडणूक प्रचारात उतरता आले नाही. आपले पुत्र बिलावलही निवडणूक प्रचारापासून दूर राहिले. आमच्या पक्षाचे नेते माजी पंतप्रधान गिलानी हे त्यांच्या मुलाचे अपहरण झाल्याने प्रचारात उतरू शकले नाहीत तर दुसरे पंतप्रधान रझा परवेझ अश्रफ हे त्यांच्यावरील खटल्यातच गुंतून राहिले.अशा सार्यास कारणामुळे पाकिस्तान पीपल्स पार्टी निर्नायकी अवस्थेत राहिली त्याचा मोठा फटका आम्हाला बसला.

तालिबान्यांच्या धमकीमुळे आम्ही पंजाबात प्रचार करू शकलो नाही. न्यायव्यवस्थाही आमच्या विरोधातच होती. त्यातच निवडणूक प्रक्रियेतील अधिकार्यांषनी दुसर्याा पक्षांच्या नेत्यांशी संगनमत केल्यानेही आम्हाला आमच्या जागा गमवाव्या लागल्या, असे विश्लेंषण त्यांनी आपल्या पराभवाचे केले आहे. आम्ही एकाचवेळी सर्व आघाड्यांवर लढणे शक्य झाले नाही.

नव्या राजकीय निकालाच्या पार्श्वहभूमीवर आपण राजीनामा देणार का, असे विचारता त्यांनी नाही असे उत्तर दिले. ते म्हणाले की, आपल्या अध्यक्षपदाची घटनात्मक मुदत सप्टेंबरपर्यंत आहे आणि तोपर्यंत आपण या पदावर राहणार आहोत, असे त्यांनी पत्रकारांना सांगितले. अध्यक्षपदाची मुदत संपल्यानंतरही आपण राजकारणात सक्रिय राहणार आहोत, असे त्यांनी यावेळी नमूद केले.

Leave a Comment