साहेब बिबी और गँग्स्टर

चित्रपटांचा सिक्वेल करणे ही आता बॉलिवुडसाठी नविन गोष्ट राहिली नाही. असे असले तरी कोणत्या चित्रपटांचा सिक्वेल बनावयला हवा यासठी कोणताही नियम नाही. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर हिट ठरलेल्या चित्रपटांचा सिक्वेल तयार केला जातो. तिग्मांशु धुलीयाचा साहबम बीबी और गँगस्टर हा चित्रपट आला होता. बॉक्स ऑफिसवर हिट नसला तरी या चित्रपटाची चर्चा मोठ्या प्रमाणावर झाली होती त्याचा सिक्वेल घेऊन तिरमांशु आता आहे.

साहब, बीबी और गँगस्त्टर रिटर्नची कथा मागील भागावरून पुढे सूरू झाली आहे. यामध्ये आता जिमी शेरगिल आपल्याला व्हीलचेअरवर बसलेला दिसतो. त्याचे खास असलेले सर्व लोक मारले गेले आहेत. मात्र तो सुरक्षित आहे. त्याला आता त्याच्या सुंदर बायकोमध्ये कोणत्याही प्रकारचा इन्टरेस्ट राहिलेला नाही. बीबीच्या भुमीकेत असलेली माही गिल पुन्हा त्याच अदाकरीत आपल्या समोर आलेली आहे. साहिबच्या क्षेत्रावर आता तिचेच राज्य आहे. गँगस्टरच्या भूमिकेत नवीन जबरदस्त एन्ट्री झाली आहे ती इरफान खानची! सोहा अली खान साहिबच्या दुसर्‍या बायकोच्या भूमिकेत आहे. ह्र्र चारही पात्र आपल्याश्रला कथेशी बांधून ठेवतात.

हा चित्रपट समजून घेण्यासाठी किंवा आवडण्यासाठी याचा पहिला भाग पाहिलेला असावा याची आवश्यकता नाही. कारण चित्रपटात वेळोवेळी सांगण्यात आले आहे की; ‘ हर रिश्ते के पिछे कोई साजिश है’! गँगस्टर राजा बनू शकला असता मात्र त्याला त्यापेक्षा बदला घेण्यात जास्त आनंद आहे. यामधून उत्तरप्रदेश, बिहार मधील स्थानिक पातळीवरील राजकीय नेतृत्वाच्या स्पर्धेचा आवाका आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न सिनेमा दिग्दर्शक करतात.

इंद्रनील सिंह ही गँगस्टरची भूमिका अतिशय प्रभावीपणे अभिनेता इरफान खानने साकारली आहे. इरफानला मिळणारी प्रत्येक भूमिकाच आशयपूर्ण असते. कधी काही कमतरता असली तरीही तो त्या मर्यादांवर आपल्या अभिनयाने मात करतो. या चित्रपटातही त्याने हीच अभिनयाची जादू दाखवली आहे. हासिल, पानसिंग तोमरपासून जमलेली तिग्मांशू आणि इरफानची केमिस्ट्री इथेही कायम असल्याचे दिसते.

तिग्मांशू आपल्या चित्रपटांमध्ये नेहमीच वेगळे विषय हाताळत आला आहे. त्याने या सिक्वेलमध्येही आपली वेगळी प्रतीमा जपण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. मात्र इतर चित्रपटांच्या तुलनेत तो कमी यशस्वी झाला आहे. इरफान खान आणि सोहा अली खानच्या एंट्रीमुळे या चित्रपटाकडून आणखी वेगळ्या अपेक्षा होत्या. मात्र त्या पूर्ण करण्यात तिग्मांशू अपयशी ठरला आहे असे सुरूवातीला वाटते. मात्र त्याने ज्या पदद्धतीने शेवट केला आहे तो प्रशंसनीय आहे.

कदाचित तो याच्या पुढचा भाग तयार करेल कारण कथेला तसे ओपन ठेवण्यात आले आहे. चित्रपटाची कथा, पटकथा यावर दिग्दर्शकाने काम केले आहे. यामुळे प्रेक्षक कथेशी बांधील राहतो. दिग्दर्शकाची कुठेही पकड ढिली झालेली नाही. चित्रपटाच्या संगीताची बाजू इतर बाबींपेक्षा कमकुवत आहे. पहिला भाग आवडला तसेल हा रिटर्न नक्की भावेल यात शंका नाही.

चित्रपट – साहेब, बीबी और गँगस्त्टर रिटर्न, दिग्दर्शक -तिग्मांशू धुलिया, निर्माता – राहुल मिश्रा, नितिन आहुजा, तिग्मांशु धुलिया, संगीत – संदिप चौटा, कलाकार – इरफान खान, जिमी शेरगील, सोहा अली खान, माही गिल, राज बब्बर, मुग्धा गोडसे.

Leave a Comment