सील कमांडोने वापरलेल्या चाकूची १९ लाखांना विक्री

वॉशिंग्टन – दोन वर्षांपूर्वी २ मे या दिवशी अमेरिकेच्या सील कमांडोंनी पाकिस्तानातील अबोटाबाद येथे घुसून अल कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेन याची हत्या केली होती. त्या सील कमांडो पथकातील एका सील कमांडोकडे असलेला चाकू लिलावात विक्रीसाठी आला असता त्याला तब्बल १९.३५ लाख रूपये किंमत मिळाली असल्याचे समजते.

या विषयी मिळालेल्या माहितीनुसार प्रत्यक्ष हल्ला करणारया सहा सील कमांडोच्या पथकातील एक असलेला आणि मार्कओवेन या टोपण नावाने नो इझी डे या पुस्तकाचे लेखन केलेला मॅट बिसोनेट याला हा चाकू इमर्सन नाईफ कंपनीचा मालक अर्नेस्ट याने आठ वर्षांपूर्वी भेट दिला होता. प्रत्येक मोहिमेत तो हा चाकू बरोबर बाळगत असे. ओसामा बिन लादेन वर घातलेल्या धाडीच्यावेळीही हा चाकू त्याच्याबरोबर होता. याच चाकूला लिलावात ३५,४०० डॉलर्सची म्हणजे १९.३५ लाख रूपयांची बोली मिळाली. या वेळी अन्य कांही वस्तूंचाही लिलाव केला गेला व त्यातून मिळालेली ७५ हजार डॉलर्सची रक्कम विविध सेवाभावी संस्थांना देण्यात आली असेही सांगितले जात आहे.

Leave a Comment