औरंगजेब

औरंगजेब म्हटलं की आपल्या नजरेसमोर एक इतिहास उभा राहतो. आजच्या काळात राजे-महाराजे नसले तरी रिअल इस्टेटच्या माध्यमातून आपले साम्राज पसरविण्याचा प्रयत्न अनेक लोक करतात हे सत्य शहराजवळील जमीनेचे गगनाला भिडणारे भाव बघितल्यावर लक्षात येते. औरंगजेबची सुरुवात अशाच एका नवश्रीमंत गुंठामंत्र्यांकडून जमीन बळकावण्याच्या दृश्याने होते. रिअल इस्टेटमध्ये साम्राज्य उभे करू पाहणार्यां ची जीवघेणी स्पर्धा या चित्रपटातून अतुल सबरवालने मांडली आहे.

‘औरंगजेब’ चित्रपटाची कथा दिल्ली जवळ नव्याने नावारूपास आलेल्या गुरगाव शहरालगत लँड माफियांच्या वाढत्या प्रभावावर आधारित आहे. अजय आणि विशाल हे जुळे भाऊ वेगवेगळे वाढले आहेत. त्यांचे वडील यशवर्धन (जॅकी श्रॉफ) उद्योगपती आहेत आणि त्यांचे चांगल्या-वाईट लोकांशी संबंध आहेत.पोलीससुद्धा त्यांचा भांडाफोड करू शकत नाही. काही वर्षापूर्वी एक पोलीस ऑफिसर (अनुपम खेर) तसा प्रयत्न करतो, मात्र त्यात त्याला यश मिळत नाही.उलट त्याचे यशवर्धनच्या पत्नीवर (तन्वी आझमी) प्रेम जडतं. तो तिला आणि तिच्या एका मुलाला घेऊन जातो. मात्र, ते त्या दोघांना एन्काऊंटरमध्ये मारल्याच्या आरोपावरून त्याच्यावर त्याला निलंबित करण्यात येते.विशाल व त्याची आई जिवंत असल्याचे कळल्यावर डीसीपी (ऋषी कपूर) आणि एसीपी आर्या (पृथ्वीराज) अनुपम खेरच्या निलंबनाचा दाग पुसण्यासठी यशवर्धनच्याघरात अजयच्या जागी विशालला पाठवतात आणि त्याचे साम्राज्य नाहीसे करण्याचा प्रयत्न करतात.

त्यात त्यांना यश मिळते का?, जुळे भाऊ समोरासमोर आल्यावर काय होणार? अशा प्रश्नां ची उत्तरे चित्रपटगृहात जाऊन मिळवणे अधिक रंजक ठरणार आहे. औरंगजेब बादशहाचे नाव चित्रपटाला असले तरी त्याचा कथेशी थेट कोणत्याही प्रकारचा संबध नाही, औरंगजेब बादशहाची मानसिकता, प्रवृत्ती दाखविण्याचा यात प्रयत्न करण्यात आला आहे. मध्यंतरापूर्वी काही ठिकाणी दिग्दर्शकाची पकड सुटली आहे. मात्र, नंतर त्याने कुठेही कमी नसल्याचे दाखवण्यात यश मिळवले आहे.

यशराज फिल्मस् म्हटल की हळूवार प्रेमकथा हे समीकरण. इथे मात्र हे समीकरण लागू नाही. ‘औरंगजेब’ हा लँडमाफियाच्या भोवती फिरणारा भरपूर अॅयक्शन सिक्वेन्स असणारा बिग बजेट चित्रपट आहे. चित्रपटाची कथा बॉलीवूडच्या नेहमीच्याच साच्यातली असली तरी तिची दिग्दर्शकाने केलेली हाताळणी पूर्णपणे नव्या युगातली आहे. दोन्ही भावांचा जन्म आणि नंतर त्यांची झालेली ताटातूट हे उत्तमरीत्या चित्रीत करण्यात आले आहे. आपले लोक महत्त्वाचे की अपली स्वप्ने या संघर्षाची उत्तम सांगड अतुलने औरंगजेबमध्ये घातली आहे.

’इशकजादे’द्वारे बॉलीवूडमध्ये एन्ट्री करणार्याल अर्जुन कपूरला या चित्रपटात दुहेरी भूमिका करण्याची संधी मिळाली आहे. तो अजय आणि विशालच्या भूमिकांमध्ये चपखल बसला आहे. ऋषी कपूरनं डीसीपीच्या भूमिकेत भाव खाल्ला आहे. औरंगजेबच्या प्रत्येक दृश्यावर त्याने छाप सोडली आहे. जॅकी श्रॉफनेही आपली भूमिका उत्तम सादर केली आहे. अर्जुन आणि साशाच्या हॉट सिन्समुळे चित्रपटाची झाली पण, त्यांच्यात म्हणावी तशी केमेस्ट्री न जमल्याने हे सीन नसते तरी चित्रपटात फारसा फरक पडला असता असे वाटत नाही.साशाला त्या सिन्सशिवाय काही काम नाही. रोमॅटिंक वाट सोडून अॅमक्शनच्या मार्गावर धावणारा यशराज फिल्म्सचा औरंगजेब पाहायला हरकत नाही.

चित्रपट – औरंगजेब
निर्माता – आदित्य चोप्रा
दिग्दर्शक – अतुल सबरवाल
संगीत – अमृ्त्य राहुत, विपीन मिश्रा
कलाकार – अर्जुन कपूर, पृथ्वीराज, ऋषी कपूर, साशा आगा, अमृता सिंग, जॅकी श्रॉफ

रेटिंग – * * *

Leave a Comment