
इटानगर, दि. २० – भारतीय गिर्यारोहकांसाठी शनिवारचा दिवस म्हणजे सुवर्णाक्षराने लिहून ठेवावा, असाच ठरला. शुक्रवारी तिघा जणांनी जगातील सर्वोच्च एव्हरेस्ट शिखर सर केल्यानंतर ईशान्य भारतातील आणखी ९ गिर्यारोहकांनी शनिवारी एव्हरेस्ट पादाक्रांत केले. शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास ६ जणांनी दक्षिण कोलहून अंतिम चढाईस सुरुवात केली. प्रतिकूल हवामान, तुफानी वारे आदींना रात्रभर तोंड देत नेपाळच्या स्थानिक वेळेनुसार पहाटे ५ वाजून ५० मिनिटांनी त्यांनी एव्हरेस्टवर पाऊल ठेवले, अशी माहिती अरुणाचल माऊंटेनिअरिंग अँड अॅनडव्हेंचर स्पोर्ट्स असोसिएशन (एएमएएसए) चे अध्यक्ष त्सेरिंग वांजे यांनी दिली.