सनरायझसर्ला मोठ्या फरकाने विजय आवश्यक

हैदराबाद- आयपीएलमधील शेवटच्या लढतीत रविवारी हैदराबाद सनरायझर्सची गाठ घरच्या मैदानावर गतविजेता कोलकाता नाइट रायडर्सशी पडणार आहे. शुक्रवारी झालेल्या लढतीत राजस्थान रॉयल्सना हरवणा-या यजमानांना विस्कळीत कोलकात्याला हरवून ‘प्ले ऑफ’मधील स्थान नक्की करण्याची संधी आहे. मात्र त्यासाठी सनरायझसर्ला मोठ्या फरकाने विजय आवश्यक आहे. बंगळूरु आणि त्यांच्यात चौथ्या स्थानासाठी चुरस आहे. काल झालेल्या लढतीत बंगळूरुने चेन्नईवर मात हैदराबादला आज मोठया फरकाने जिंकावे लागेल.

१५ सामन्यांत १८ गुण मिळवलेल्या सनरायझर्सना अंतिम चार संघात स्थान मिळवण्याची सर्वाधिक संधी आहे. त्यांच्यासह बंगळूरुमध्ये चौथ्या स्थानासाठी चुरस आहे. गतविजेत्या कोलकात्याने या मोसमात निराशा केली. १५ लढतींमध्ये त्यांना केवळ ६ सामने जिंकता आले. गंभीर आणि सहकाऱ्यांची खालावलेली कामगिरी पाहता हैदराबादचे पारडे जड वाटते.

प्रभावी गोलंदाजी हे सनराझर्सचे बलस्थान आहे. तेज गोलंदाज डेल स्टेन, फिरकीपटू अमित मिश्रा तसेच करन शर्मा, थिसरा परेरा आणि डॅरेन सॅमीने सातत्य दाखवले आहे. राजस्थानविरुद्ध त्याचीच प्रचिती आली. १३७ धावा फलकावर असूनही स्टेन, शर्मा, मिश्रा आणि परेराच्या प्रभावी गोलंदाजीमुळे प्रतिस्पर्ध्यांना ११३ धावांत गुंडाळून सहज विजय मिळवण्यात सनराझर्सना फार प्रयास पडले नाहीत. फलंदाजीत ‘स्टार्स’ नसले तरी शिखर धवन, हनुमा विहारी, बिपलब समंतराय, थिसरा परेराने चांगले योगदान दिले आहे. घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा यजमानांना मिळेल.

सातत्य राखण्यात आलेले अपयश कोलकात्याच्या खराब कामगिरीचे प्रमुख कारण आहे. कर्णधार गंभीर, ज्याक कॅलिस, युसुफ पठाण, रायन टेन डोएशाते, लक्ष्मीपथी बालाजी असे प्रसिद्ध क्रिकेटपटू असूनही गतविजेत्यांना सर्व आघाडय़ांवर अपयश आले. मात्र अपयश मागे टाकताना हैदराबादला हरवून स्पर्धेचा शेवट गोड करण्याची कोलकात्याला आहे.

Leave a Comment