दाऊदचे नाव सांगून युवा खेळाडूना धमक्या

नवी दिल्ली- स्पॉट फिक्सिंगमध्ये दाऊद कंपनीचा सहभाग असल्याची शक्यता वर्तवली जात होती. आता ती खरी ठरली असून युवा खेळाडूंना सट्टेबाज दाऊदच्या नावाने धमकावत असल्याचे एका वृत्त प्रसारमाध्यमांनी व्यक्त केले आहे. दिल्ली पोलिसांच्या सुत्रांच्या आधारे हा खुलासा करण्यात आला आहे. युवा खेळाडूंना अंडरवर्ल्डने विशेष लक्ष्य केले होते. त्यांना शिवीगाळ करणे तसेच दाऊद इब्राहिमच्या नावाने धमकावणे असे प्रकार सट्टेबाज करत होते अशी माहितीही या वृत्तपत्राने दिली आहे. त्यामुळे आता पोलिसाचा त्या दिशेने तपास सुरु आहे.

दिल्लीचे पोलीस कमिशनर नीरजकुमार यांनी यापुर्वीच स्पॉट फिक्सिंग प्रकरणातला सुत्रधार हा परदेशात आहे, असा दावा केला होता. हा परदेशातला सुत्रधार म्हणजे दाऊद इब्राहिमच असल्याची शक्यता आता बळावली आहे. सट्टेबाजीचा मास्टरमाईंड दाऊद इब्राहिम असल्याचे आता लपून राहिलेले नाही. दाऊद आणि फिक्सिंग यांचे गेले तीन दशकांपासून कनेक्शन आहे. क्रिकेटमधल्या डी कंपनीच्या काळ्या धंद्याचा पर्दाफाश झाला आहे.

आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी नवी दिल्ली पोलिसांच्या तपासातून आता स्पॉट फिक्सिंग आणि अंडरवर्ल्डचे संबंध असल्याचे उघड झाले आहे. दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या चंद्रेश या बुकीचे दुबाईमध्ये असलेल्या सुनील अभिचंदानी उर्फ सुनील दुबई या बुकीशी संबंध असल्याचे तपासात उघड झाले आहे. आता पोलिस त्या मार्गाने शोध घेत आहेत.

Leave a Comment