२०१४ त जागतिक लोकसंख्येच्या दुप्पट मोबाईल संख्या

नवी दिल्ली दि. १८- पुढील वर्षात म्हणजे २०१४ सालापर्यंत पृथ्वीवर असलेल्या लोकसंख्येच्या दुप्पट संख्येने मोबाईल ग्राहक असतील असा अंदाज इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियनने व्यक्त केला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या या एजन्सीने २०१३ सालात मोबाईल ग्राहकांची संख्या जागतिक लोकसंख्येइतकी झाल्याचे आणि त्यातील निम्मे मोबाईल ग्राहक आशिया पॅसिफिक विभागातील असल्याचेही नमूद केले आहे.

संस्थेने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार २०१४ सालात मोबाईल ग्राहकांची संख्या ७ अब्जांपेक्षा अधिक होणार असून सध्या आकडा लोकसंख्येच्या ९६ टक्के इतका आहे. त्यात विकसित देशांचा वाटा १२८ तर विकसनशील देशांचा वाटा ८९ टक्के इतका आहे. या आकडेवारीनुसार सध्या जागतिक लोकसंख्येच्या ४० टक्के म्हणजे २.७ अब्ज नागरिक ऑनलाईन आहेत.

विकसनशील देशांत ८२.८ कोटी माहिला तर ९८ कोटी पुरूष इंटरनेटचा वापर करतात तर विकसित देशात हेच प्रमाण अनुक्रमे ४७.५ कोटी महिला व ४८.३ कोटी पुरूष इतके आहे. २०१२ सालात ७० टक्के लोकांनी पोस्टपेडपेक्षा प्रीपेड मोबाईला पसंती दिली असून विकसनशील देशात हाच आकडा ८७ टक्के आहे. जगात १०० देशांत लोकसंख्येपेक्षा अधिक मोबाईल ग्राहक आहेत तर सात देशांत हेच प्रमाण लोकसंख्येच्या दुप्पट आहे असेही या आकडेवारीत नमूद केले गेले आहे.

Leave a Comment