कोठडीत संजुबाबाने वाचली धार्मिक पुस्तके

मुंबई दि.१८ – कासाबच्या कोठडीत ठेवण्यात आलेल्या साज्नुबाबासाठी आपल्या ४२ महिन्यांच्या कारावासाच्या शिक्षेची पहिली रात्र अस्वस्थ करणारी गेली. त्याला ऑर्थर रोड कारागृहातच ठेवायचे की, अन्यत्र रवानगी करायची, याविषयी पोलीस प्रशासनाने अद्याप कोणताच निर्णय न घेतल्याने, सध्या तरी काही दिवस संजयला येथेच अंडासेलमध्ये काढावे लागणार आहेत. तुरुंगातल्या पहिल्या रात्री नीट झोपू न शकलेल्या संजयने काही धार्मिक ग्रंथांचे वाचन केले. त्यामध्ये भगवद्गीता, हनुमान चालिसा अशी पुस्तके होती. तसेच सकाळी त्याने थोडासा व्यायामही केला.

संजय दत्तला ऑर्थर रोड कारागृहातच ठेवायचे की त्याची अन्यत्र रवानगी करायची, या विषयावर अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. त्याला इथेच ठेवायचे की हलवायचे याची चर्चा करण्यात अर्थ नाही असे मत अतिरिक्त तुरुंग महासंचालक मीरा बोरवणकर
यांनी व्यक्त केले आहे.

Leave a Comment