‘ एलबीटी ‘ बंदमुळे नागरिकाचे हाल

मुंबई – घाऊक व्यापा-यांनी नव्या जोमाने ‘ एलबीटी ‘ विरोधात आंदोलन छेडले आहे . मुख्य बाजारपेठेतील व्यवहारही बंद झाले असून शुक्रवारपासून व्यापा-यांनी अनेक भागांत ‘ ताकद ‘ पणाला लावल्याने किरकोळ दुकानेही धडाधड बंद होत गेली . त्यामुळे सामान्य ग्राहकांची तारांबळ उडाल्याचे दिसत होते. गेल्या आठ दिवसापासून सुरु असलेल्या बंदमुळे नागरिकाचे हाल होत असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. दुसरीकडे एलबीटीच्या निर्णयावर माघार घेणार नाही , असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोलापुरात सांगितले. त्यामुळे चिंता वाढली आहे.

बाजार बंद असल्याने वस्तूंचा पुरवठा होत नसल्यामुळे किरकोळ दुकानदारांची पंचाईत झाली आहे . त्यांच्याकडील वस्तूंचा साठाही कमी होत चालला आहे. त्यातून साखर, रवा, नारळ, गूळ आदींच्या पुरवठ्यावर त्याचा परिणाम झाल्याची माहिती विक्रोळीतील ‘ जय माता दी ग्रेन स्टोर्स ‘ चे अरविंद परमार यांनी दिली . काही ठिकाणी जीवनाश्यक वस्तूंच्या तुटवड्याचा फायदा उठवत साखर , रवा , नारळ , गूळ अशा दैनंदिन वस्तूंचा काळाबाजार होऊ लागला आहे . या वस्तूंच्या दुपटीहून जास्त किमतीला विकल्या जात होत्या.

एलबीटीच्या निर्णयावर माघार घेणार नाही , असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले . एलबीटीविरोधात बंदची भूमिका कायम ठेवल्यास व्यापा-यांना सरळ करणार का , असा प्रश्न पत्रकारांनी केला असता, ‘ कदाचित ‘ असे उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले.

Leave a Comment