आमदार सुरेश धस यांच्या अटकेची शक्यता

बीड: पाटोद्यातील स्टेट बँक ऑफ हैद्राबादमध्ये तोडफोड केल्याप्रकरणी आष्टीचे आमदार सुरेश धस यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. आमदार धस आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ३० – ३२ कार्यकर्त्यांनी, पाटोद्यातील स्टेट बँक ऑफ हैद्राबादमध्ये तोडफोड केली होती, या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील ७ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना कोर्टाने २० तारखेपर्यंत कोठडी सुनावली आहे.

आमदार धस हे तलावातील गाळ काढून शेतात टाकण्यासाठी कर्ज मिळावे , यासाठी हैदराबाद बँकेत गेले होते. यावेळी शाखाधिका-यांशी त्यांचा वाद झाला. बरीच शाब्दीक चकमक झाल्यानंतर धस बँकेतून बाहेर आले. मात्र त्यानंतर धस यांच्या कार्यकर्त्यांनी बँकेत घुसून तोडफोड केली.

यामुळे घाबरलेल्या कर्मचा-यांनी अखेर पोलिसांना कल्पना दिली. त्यानंतर पोलिसांनी धस यांच्यासह ३२ जणांवर तोडफोड करुन कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या मुळे आता आमदार सुरेश धस यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता सूत्राने वर्तवली आहे.

Leave a Comment