नवी दिल्ली: आयपीएलच्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणी आता वेगवेगळे खुलासे समोर येत आहेत. राजस्थान रॉयल्सच्या अटकेत असलेल्या तिघा खेळाडूंशिवाय, आणखी तीन खेळाडूंशी बुकींनी संपर्क साधल्याचे वृत्त हाती आले आहे. त्यामुळे या प्रकरणातील खेळाडूची संख्या वाढण्याची शक्यता आहे. अटकेत असलेल्या एस. श्रीशांत, अंकित चव्हाण आणि अजित चंडिला याशिवाय, आणखी काही खेळाडूचा या प्रकरणाशी संबध आहे का याचा तपास पोलिसाकडून सुरु आहे. बुकींनी तीन खेळाडूना ऑफर दिली होती मात्र त्याने ही ऑफर नाकारली असल्याचे निष्पन झाले आहे.
बुकींनी ब्रॅड हॉज, केवान कूपर आणि सिद्धार्थ त्रिवेदी यांना देखील ऑफर दिली होती. मात्र त्यांनी ती धुडकावून लावल्याचेही एका वृत्तात म्हटले आहे. दरम्यान, स्पॉट फिक्सिंगप्रकरणात अजित चंडिला हाच प्रमुख सूत्रधार असल्याचे पुढे येत आहे.चंडिलाने, फिक्सिंगमध्ये आणखी दोन खेळाडूंना सामिल करण्याचा प्रयत्न केला असल्याचे म्हटले आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चंडिलाने चौकशी दरम्यान ही कबुली दिली आहे. सट्टेबाज मानेसरच्या कंट्री क्लबमध्ये भेटले होते. भेटीदरम्यान सट्टेबाजांनी चंदेलाला स्पॉट फिक्सिंग आणि खेळाडूंना समावेश करण्याविषयी चर्चा केली होती. बुकींनी तीन खेळाडूना ऑफर दिली होती मात्र त्याने ही ऑफर नाकारली होती. या प्रकाराशी अन्य कोणाचा संबध आहे का याची चौकशी केली जात आहे.