मंगळावर दरवर्षी आदळतात २०० लघुग्रह

वॉशिग्टन दि.१८ – नासाच्या वैज्ञानिकांच्या मते मंगळावर दरवर्षी सरासरी २०० लघुग्रह अथवा धुमकेतू आदळतात व यामुळे मंगळावर ३.९ मीटरचे खड्डे बनतात. संशोधकांच्या मते हे लघुग्रह अथवा धुमकेतू १ ते २ मीटर व्यासाचेच असतात. परिणामी ते थेट जमिनीवर आदळत नाहीत. मात्र तरीही मंगळावरील वातावरण अतिशय पातळ य विरविरीत असल्याने जमिनीवर खड्डे तयार होतात.

अॅरिझोना विद्यापीठातील इनग्रिड डाऊबर या संशोधकांच्या मते मंगळावर लघुग्रह अथवा धुमकेतू आदळल्याने खड्डे पडतात यात शंका नाहीच. पण असे खड्डे पडताच त्वरीत त्या जागेचे संशोधन केले जायला हवे. यामुळे मंगळ हा सक्रीय ग्रह असल्याचे सिद्ध होईल. सॅटेलाईटनी टिपलेल्या मंगळाच्या फोटोत गेल्या दशकात अशा प्रकारे खड्डे पडलेल्या २४८ जागांचा शोध लावला गेला आहे असेही समजते.