झपाटलेलाय या चित्रपटाचा उल्लेख निघाला कि सर्वप्रथम आठवतो तो तात्या विंचू आणि त्याला मओम फट्स्वाहा हा मृत्युंजय मंत्र देणारा बाबा चमत्कार. झपाटलेलाय चित्रपटाची कथा, गाणी, अँक्शन या सोबतच आजही प्रेक्षकांच्या लक्षात राहणारी गोष्ट म्हणजे ती यातील तात्या विंचू, लक्ष्या बोलके, कुबडया खवीस आणि बाबा चमत्कार अशा काहीशा विचित्र नावांच्या व्यक्तिरेखा. त्या काळात त्यांनी धम्माल उडवून दिली होती. हीच धमाल येत्या 7 जूनला प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे झपाटलेला 2 या मराठीतल्या पहिल्या थ्रीडी आणि सिक्वलमधून. झपाटलेलामध्ये
झपाटलेला 2-पुन्हा बाबा चमत्कार.
असणारे कलाकार या सिक्वलमधेही बघायला मिळणार आहेत. ज्येष्ठ अभिनेते राघवेंद्र कडकोळ यांनी साकारलेला हा बाबा चमत्कार त्याकाळी प्रचंड लोकप्रिय ठरला होता. घनदाट जंगलातील अंधार्या गुहेत होम हवन आणि तंत्र-मंत्राच्या शक्तीच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात भीती निर्माण करण्याचं काम बाबा चमत्कारने केलं होतं. झपाटलेला मधील बाबा चमत्कार या पात्राबद्दल कडकोळ आजही भरभरुन बोलतात,महेश कोठारे यांच्या दिग्दर्शनाची पध्दत खूप वेगळी आहे
. चित्रपटाची स्क्रिप्ट त्यांच्या डोक्यात अगदी फिट असते आणि त्या आधारेच ते प्रत्येक दृश्य एकदम उत्तमरित्या साकारतात. याही चित्रपटात मला हाच अनुभव आला. मुळात बाबा चमत्कार हे पात्र नावाप्रमाणेच चमत्कारिक आहे. त्याची वेशभूषा, संवाद, तो मंत्र यामुळे लहानांपासून मोठयांपर्यंत सर्वांच्याच तो लक्षात आहे. त्यामुळे झपाटलेला 2 मधील बाबा चमत्कार पण तेवढाच लोकप्रिय होईल असा मला विश्वास आहेय. हा चित्रपट करतानाच्या अनुभवाबद्दल ते सांगतात, आजवर थ्रीडी तंत्रज्ञान पडद्यावर बघितले होते. इथं ते प्रत्यक्षात अनुभवायला मिळालं. परदेशी तंत्रज्ञ त्यांची काम करण्याची पध्दत हा सर्वच अनुभव नवा होता. पहिल्या भागाच्यावेळी मी वयाच्या पन्नाशीत होतो आणि सिक्वलच्या वेळी मी वयाच्या सत्तरीत आहे.
त्यामुळे ही भूमिका करु शकणार की नाही याबद्दल मनात शंका होती, परंतू महेशने अगदी हक्काने आणि हट्टाने माझ्याकडून ही भूमिका करवून घेतलीय. कोठारे अँण्ड कोठारे व्हिजनय निर्मित, व्हायकॉम 18 आणि मुव्हींग पिक्चस प्रस्तुत झपाटलेला 2 मध्ये आदिनाथ कोठारे, मकरंद अनासपुरे, सोनाली, सई ताम्हणकर, मधु कांबीकर, सुनील तावडे, विजय पटवर्धन आणि दिलीप प्रभावळकर आदींच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
झपाटलेला मध्ये तात्या विंचू या कुख्यात गुंडास बाबा चमत्कार मृत्युंजय मंत्र देतो आणि तात्या विंचू आपला प्राण बाहुल्यामधे टाकुन मृत्युनंतरही नव्या रुपात जिंवत राहतो. लक्ष्याच्या जीवावर उठलेल्या या तात्या विंचूचा खातमा करण्यात इन्स्पेक्टर महेश जाधव यशस्वी झाला होता.
आता 20 वर्षानंतर हा तात्या विंचू परत एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. त्याच्या परतण्यासाठी बाबा चमत्कार नेमका काय चमत्कार करतो हे प्रत्यक्ष चित्रपटातच बघणं रंजक ठरेल.