कान्स महोत्सवात गोळीबाराच्या आवाजाने पळापळ

कान्स दि. १८ – फ्रान्स येथे दरवर्षी साजर्‍या होणार्‍या प्रतिष्ठेच्या कान्स चित्रपट महोत्सवात कार्यक्रम सुरू असतानाच अचानक बंदुकीच्या फरी झाडल्याचे आवाज आल्याने उपस्थित सेलिब्रिटी आणि प्रेक्षकांनी जीव वाचविण्यासाठी सुरक्षित स्थळी धाव घेतल्याची घटना घडली. शुक्रवारी अॅक्टर ख्रिस्तोफर वॉल्झ आणि ढॅनियल ऑटील यांच्या प्रकट मुलाखतीच्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण सुरू असताना ही घटना घडली. त्यामुळे थेट प्रक्षेपण काही काळ बंद पडले.

या दोघा कलाकारांनी मुलाखत सुरू असतानाच बंदुकीचे आवाज ऐकले तसेच अन्य अनेक प्रेक्षकांनीही हे आवाज ऐकले आणि एकच आरडाओरड झाली. कलाकारांबरोरच प्रेक्षकांनीही जीव वाचविण्यासाठी धाव घेतली. टिव्हीच्या फूटेजमध्ये हा सारा प्रकार दिसून आला. मात्र बंदुकीतून रिकाम्याच काडतुसांच्या फैरी झाडल्या गेल्याचे समजताच कांही वेळातच प्रक्षेपण पूर्ववत सुरू करण्यात आले. दरम्यान फोटोग्राफर्सनी काढलेल्या फिल्ममध्ये मुलाखत सुरू असलेल्या स्टेजजवळच कांही पोलिसांनी एका बंदुकधारी इसमाला जमिनीवर पाडून जेरबंद केल्याचेही दिसले.

या इसमाकडून स्टार्टर्स पिस्तुल, खिशात ठेवता येईल असा चाकू आणि प्लॅस्टीकचे ग्रेनेड जप्त करण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे.

Leave a Comment