अमेरिकेत स्थलांतर करणार्‍या हिंदूंच्या संख्येत दुपटीने वाढ

अमेरिकेला स्थलांतर करणार्‍या हिदूंच्या संख्येत गेल्या दशकाच्या तुलनेत दुप्पट वाढ झाली असून त्यातील बहुसंख्य हिंदू हे भारतातून आलेले आहेत असे पोऊ संशोधन संस्थेने केलेल्या नव्या सर्वेक्षणातून दिसून आले आहे.

या संस्थेने जाहीर केलेल्या अहवालानुसार १९९० च्या दशकांत दरवर्षी सरासरी ३० हजार हिदू स्थलांतरासाठी अर्ज करत असत. २०१२ मध्ये हीच संख्या ७० हजारांवर गेली आहे. यात भारतातून येणार्‍या हिंदूचा वाटा सर्वाधिक असून अन्यांत नेपाळ आणि भूतान या राष्टातील हिंदू आहेत. तुलनेने कॅरिबियन (वेस्ट इंडिज) येथून स्थलांतर करून येणार्‍या हिदूंच्या संख्येत घट झाली आहे. १९९० या दशकात हे प्रमाण १६ टक्के होते ते आता ५ टक्क्कयांवर आले आहे.

अमेरिकेत कायदेशीर स्थलांतर करणार्‍यात ख्रिश्चन बहुसंख्येने आहेत तरीही कायमस्वरूपी वास्तव्यास येणार्‍या ख्रिश्चनांचे प्रमाण गेल्या दशकात ६८ टक्क्यावरून ६१ टक्कयांवर घसरले आहे. याच काळात ग्रीन कार्ड घेणार्‍या अल्पसंख्यांकांचे प्रमाण मात्र १९ वरून २५ टक्कयांवर गेले आहे. त्यात मुस्लीमांचे प्रमाण १० टक्के तर बुद्धिस्टांचे प्रमाण ६ टक्के असल्याचे समजते. ग्रीन कार्ड घेणार्‍या हिदूंचे प्रमाण ७ टक्के इतके आहे असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

Leave a Comment