अमेरिकेच्या ताफ्यात ड्रोन एक्स 47 बी फाइटर विमाने

वॉशिंग्टन, दि. १८ – अमेरिकन नौसेनेने मंगळवारी ‘ड्रोन एक्स 47 बी फाइटर जेट’ जॉर्ज डब्ल्यू बुश या विमानवाहकावर तैनात केले असून येथे त्याची चाचणी घेण्यात येणार आहे. जगात पहिल्यांदाच ‘ड्रोन एक्स 47 बी फाइटर जेट’ ला विमानवाहतूक जहाजावर तैनात करण्यात आले आहे. ते वाटवाघळासारखे दिसते आणि ४० हजार फूट उंच आकाशात उड्डाण करते. हल्ल्याबरोबरच हे विमान शत्रूवर बारीक नजर ठेवू शकते. याची निर्मिती नॉथ्रप ग्रॅमन कंपनीने केली आहे. सध्या फायटर जेट प्रकाराची दोन विमाने बनवण्यात आली आहे .

एफ-35/एफ-18 हॉर्नेटप्रमाणे वारंवार फायटर जेटमध्ये इंधन भरावे लागत नाही. ते पायलटरहित असल्याने कोणतीही मनुष्यहानी होण्याचा धोका नाही. उलट कमी मनुष्यबळाच्या साहाय्याने युद्धभूमी लढवली जाऊ शकते. संगणकाच्याद्वारे त्याच्यावर नियंत्रण ठेवले जाते. या जेटचा माग काढणे शत्रूपक्षाला अशक्य असल्याचा दावा केला जात आहे.