पुणे दि. १ ७ : भारताची वाढती सेल फोन बाजारपेठ काबीज करण्यास चीनी कंपन्यात स्पर्धा लागली असून जगातील चवथ्या क्रमांकाच्या झीटीईने पुण्यातील कॅलिक्स समूहाशी करार केला असून ५ ७ ९ ९ -१ ४ ९ ९ ९ रुपये या किमतीत स्मार्टफोन बाजारात आणले जाणार आहेत अशी घोषणा कंपनीचे मुख्याधिकारी शु देजून यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली कॅलिक्स समूह त्यासाठी ५ ० ० – ६ ० ० कोटी रुपये गुंतविणार असल्याचे कार्यकारी संचालक गौरव सोमाणी यांनी यावेळी सांगितले.
चीनी स्मार्टफोन भारताच्या बाजारात
झीटीई ही दूरसंचार यंत्रणा , नेटवर्क सेवा, या क्षे त्रातील अब्जा वधी डॉलर उलाढाल असलेली कंपनी असून येत्या तीन वर्षात भारतात पहिल्या तीन कंपन्यात स्थान मिळविणे हा आमचा हेतू आहे असे नमूद करून देजून म्हणाले की कंपनीचा सध्या गुरगावमध्ये कारखाना असला तरी आम्ही आयात केलेले सेल फोन प्राथमिक टप्प्यात विकणार आहोत. ही संख्या वाढल्यानंतर येथे उत्पादन सुरु केले जाणार आहे. उत्पादन खर्च परवडावा यासाठी ते आवश्यक आहे. जागतिक उलाढालीत सध्या भारताचा हिस्सा १ ० टक्के असून तो वेगाने वाढेल अशी खात्री आहे गुरगावच्या कारखान्याची क्षमता महिन्याला १ ६ हजार युनिटची आहे गेल्या वर्षी कंपनीने ३ ० कोटी हँडसेट विकले असून यंदा ती संख्या ५ ० कोटी होईल असा अंदाज आहे आम्ही काहीसे उशिरा भारताच्या बाजारात आलो असलो तरी स्पर्धक कंपन्यांची मक्तेदारी मोडून काढणे शक्य होईल.
कॅलिक्स टेलिकॉमचे कार्यकारी संचालक गौरव सोमाणी म्हणाले की बांधकाम , माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात असलेली आमची कंपनी आता दूरसंचार क्षेत्रात विस्तार करत आहे. विक्री, विपणन , मनुष्यबळ, संसाधने हे सारे मिळून आम्ही ५ ० ० कोटी रुपये गुंतविणार आहोत. चालू आर्थिक वर्षात कंपनीचे १ ० लाख हँडसेट विक्रीचे उद्दिष्ट आहे . पहिल्या टप्प्यात महाराष्ट्र ,गोवा , गुजरात ,मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या पाच राज्यात विपणन जाले उभारले जाणार आहे. दिवाळीत टाब्लेट बाजारात सा दर केली जातील. स्मार्टफोन ची पाच मॉडेल आम्ही आणणार आहोत. भविष्यात उर्जा आणि आरा मदायी सेवा क्षेत्रात प्रवेश करण्याचा कॅलिक्स चा विचार असल्याचेही त्यांनी सांगितले.
