प्रसिद्धी माध्यमांच्या घेरावने संजय दत्त हैराण

मुंबई, दि.१७ – अभिनेता संजय दत्त न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे टाडा कोर्टात हजर झाला मात्र माध्यमांनी जणू घेराव घातल्याने गाडीतून बाहेरही येणे त्याला अशक्य बनले होते. अखेर दिग्दर्शक महेश भट्ट यांनी गाडीबाहेर येऊन, माध्यमांच्या प्रतिनिधींना हात जोडून विनंती केली. मात्र माध्यमांचा अततायीपणा सुरूच ठेवला.

दुपारी तीन पर्यंत कोर्टात हजर रहायचं असल्यामुळे संजय दत्त अखेर गाडी बाहेर आला, पण त्याचा श्वास गुदगमरेल इतके कॅमेरे आणि माध्यमांच्या प्रतिनिधींना त्याला घेरून टाकले. त्यातूनही वाट काढत तो न्यायालयात दाखल झाला.

मुंबईच्या पाली हिल भागातील घरातून संजय दत्त दुपारी दीडच्या सुमारास  कोर्टाकडे रवाना झाला. यावेळी पत्नी मान्यता आणि दिग्दर्शक महेश भटट् यांनी संजय दत्तला सोबत केली. आपल्या आवडत्या स्टारचं दर्शन घेण्यासाठी चाहत्यांनी संजयच्या घराबाहेर एकच गर्दी केली. सत्र न्यायालयासमोर संजय दत्त शरणागती पत्करणार आहे. मात्र संजयची रवानगी आर्थर रोड जेलमध्ये होणार की येरवडा कारागृहात याबाबत अजूनही अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही. मुंबईतील १९९३ च्या बॉम्बस्फोटप्रकरणी संजयला पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Leave a Comment