गुगल मेल वरून अॅटॅचमेंटने पाठवा पैसे

पैसे पाठविणे अथवा स्वीकारणे कधी नव्हे इतके सुलभ करण्याचे श्रेय गुगलकडे जाईल यात आता कोणतीही शंका नाही. गुगलने त्यांच्या वार्षिक डेव्हलपर परिषदेत ज्या अनेक सुविधा देण्याची घोषणा केली त्यातच युजरला अॅटेचमेंट स्वरूपात पैसे पाठविण्याची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. गुगलच्या ईमेल सेवेतील ही महत्वाची अॅडीशन मानली जात आहे.

युजरने यासाठी मेल करतानाच ज्या व्यक्तीला पैसे पाठवायचे असतील त्याच्या मेलमध्ये डॉलर चिन्ह असलेल्या जागी क्लीक करायचे आहे व तेथे किती रक्कम पाठवायची त्याची एन्ट्री करायची आहे. विशेष म्हणजे ज्यांचे जीमेल अकौंट नाही त्यांनाही या सेवेमार्फत युजर पैसे पाठवू शकणार आहेत. यामुळे गुगलच्या जीमेल युजरची संख्या लक्षणीयरित्या वाढेल अशीही आशा व्यकत करण्यात आली आहे. तसेच युजरचा गुगलवरील विश्वास अधिक दृढ होण्यासाठीही याचा उपयोग होणार आहे.

आगामी कांही महिन्यातच ही सेवा प्रथम अमेरिकेत जीमेलवर १८ वर्षांपुढील युजरसाठी उपलब्ध केली जाणार आहे. मात्र यामुळे ई कॉमस्र कंपन्यांना चांगलाच फटका बसण्याची शक्यता असून व्हेनगो या अँड्राईड आणि आयओएस अॅप मार्फत मनी ट्रान्स्फर सेवा देणार्‍या कंपनीला तीव्र स्पर्धा निर्माण होईल असा अंदाज जाणकार वर्तवित आहेत.