संजुबाबाची टाडा कोर्टापुढे शरणागती

मुंबई, दि. १६ – मुंबई बाँब स्फोट प्रकरणात पाच वर्षाच्या कारावासाची शिक्षा झालेला आरोपी अभिनेता संजय दत्त उद्या गुरूवारी मुंबईतील टाडा न्यायालयापुढे शरण येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्याला १६ पर्यंत तुरूंगात हजर राहण्याची मुदत दिली हेाती त्या मुदतीनुसार तो आज टाडा न्यायालयापुढे हजर होत आहे.

संजूबाबाच्या शिक्षेला मुदतवाढ देण्यास कालच सर्वोच्च न्यायालयाने नकार दिल्यानंतर त्याच्या वकिलाने कोर्टापुढे अर्ज करून संजय दत्त याला मुंबईच्या टाडा न्यायालयाऐवजी पुण्याच्या येरवडा कारागृहात शरण येण्याची अनुमती मागितली होती परंतु या मागणीची याचिका त्याच्या वकिलाने मागे घेण्याची परवानगी मागितली.

वकिल सुभाष जाधव यांनी विशेष न्यायालयाला सांगितले की आपल्या अशिलाने काल येरवडा कारागृहात जाऊन शरण येण्यास अनुमती मागणारी जी याचिका केली आहे ती त्याने मागे घेण्याचा निर्णय घेतला असून उद्या ठरल्याप्रमाणे तो टाडा न्यायालयापुढे शरण येण्यास तयार आहे. संजय दत्त याने अठरा महिन्यांचा कारावास आधीच भोगला असल्याने त्याला पाच वर्षापैकी साडे तीन वर्षांचा कालावधी तरूंगात काढावा लागणार आहे.

Leave a Comment