नवी दिल्ली, दि. १६ – अनेक घोटाळ्याच्या आरोपांच्या पार्श्विभूमीवर सरकार या आरोपांबाबत फारसे गंभीर नसल्याचा समज देशातील जनतेत निर्माण झाला आहे अशी कबुली संरक्षण मंत्री ए के अॅलन्टोनी यांनी दिली आहे.तथापी भ्रष्टाचाराचा रोग समूळ नष्ट करण्यासाठी सरकार गांभीर्याने प्रयत्न करीत असून याचाच भाग म्हणून सरकारने माहितीच्या अधिकारामार्फत लोकांना महत्वाचा अधिकार प्रदान केला आहे असे ते म्हणाले. सरकारी कामकाजातील गुप्तता त्यामुळे नाहीशी झाली असून हा अधिकार वापरून सामान्य नागरीकांना भ्रष्टाचाराच्या विरोधात लढण्याचे बळ या कायद्यामुळे मिळाले आहे.
भ्रष्टाचाराच्या आरोपाबाबत सरकार गंभीर नसल्याचे समज – अॅन्टोनी
माहितीच्या अधिकाराचा कायदा अजूनही नवख्या स्वरूपात आहे परंतु येत्या काही वर्षात या कायद्यामुळे भ्रष्टाचाराला मोठ्या प्रमाणात आळा बसू शकेल असा विश्वाहस त्यांनी व्यक्त केला. आता या कायद्यामुळे कोणतीही सरकारी संस्था किंवा कार्यालय सरकारी गुप्ततेच्या आड लपून यापुढे भ्रष्टाचार करू शकणार नाही. माहितीच्या अधिकारामुळे सरकारी गुप्तता मोडीत निघाली असून भ्रष्टाचार करणे तसे सोपे राहिलेले नाही. त्यातून भ्रष्टाचाराच्या समस्येचे उच्चाटन होईल असे ते म्हणाले.
