भारताचा ऑलिम्पिक प्रवेशाचा मार्ग मोकळा

नवी दिल्ली, दि. १६ – भारतीय क्रीडा क्षेत्रासाठी आनंदाची बातमी म्हणजे भारताचा ऑलिम्पिकमधील सहभागाचा मार्ग सुकर झाला असून भारतीय ऑलिम्पिक संघटनेवर लादण्यात आलेली बंदी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेने उठवली आहे.  नवी दिल्ली येथे झालेल्या बैठकीत भारतीय ऑलिम्पिक संघटनेने आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या निवडणूकविषयीच्या नियमांचे पालन करण्याचे मान्य केल्याने भारताचा ऑलिम्पिक प्रवेशाला हिरवा झेंडा मिळाला आहे. यामुळे तब्बल पाच महिन्यांनंतर भारताचा ऑलिम्पिकमध्ये प्रवेश झाला आहे.

भारतीय ऑलिम्पिक संघटना (आयओए) आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या (आयओसी) अधिकार्‍यांच्या बैठकीत आयओएची निवडणूक रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीस क्रीडामंत्री जितेंद्र प्रसाद, क्रीडा सचिव पी. के. देव, नेमबाज अभिनव बिंद्रा आणि मालव श्रॉफ उपस्थित होते.

Leave a Comment