नवी दिल्ली दि.१६ – ग्राहकोपयोगी इलेक्ट्रोनिक्स वस्तूचे उत्पादक असलेल्या पॅनासोनिकने त्यांचा पहिला वहिला स्मार्टफोन गुरूवारी म्हणजे आज भारतात सादर केला आहे. त्यासाठी या जपानी कंपनीने मार्केटिंग, वितरण आणि ग्राहकसेवा देण्यासाठी दिल्लीच्या जैना ग्रुपशी सहकार्याचा करार केला असल्याचेही वृत्त आहे.
गेल्याच महिन्यात पॅनासोनिकने ४ नवीन ड्यूरेबल सिक्युअर मोबाईल कॉम्प्युटिंग उपकरणे सादर केली होती. कंपनीने टफ पॅड एफ झेड- जीआय हे विंडोज आठवर चालणारे टॅब्लेट नुकतेच सादर केले आहे तसेच टफ पॅड जीटी-बी १ हा सात इंची स्क्रीन असलेला अँड्राॅईड टॅब्लेटही यापूर्वीच सादर केला आहे. या दोन्ही टॅब्लेटना एलसीडी स्क्रीन व दीर्घकाळ चालणारी बॅटरी अशी सुविधा आहे.